Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedबनावट नोटांचे प्रकरण मिटवण्यासाठी समीर वानखेडेंची देवेंद्र फडणवीसांनी मदत घेतली- नवाब मलिक

बनावट नोटांचे प्रकरण मिटवण्यासाठी समीर वानखेडेंची देवेंद्र फडणवीसांनी मदत घेतली- नवाब मलिक


मुंबई (रिपोर्टर)- नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतली असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी केला होता. हे आरोप बिनबुडाचे असून, फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांचा स्फोट करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस त्या अधिकार्‍याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्या अधिकार्‍याचे आणि फडणवीसांचे जुने संबंध आहेत. २००८ मध्ये आलेला अधिकारी १४ वर्षे मुंबईतच आहे यामध्ये काय कारण आहे. देवेंद्र फडणवीस दुसर्‍यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले?, असा सवाल नवाब मलिकांनी केला.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली तेव्हा देशभरात खोट्या नोट्या पकडल्या जावू लागल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात खोट्या नोटांचे एकही प्रकरण समोर आले नाही. कारण देवेंद्र फडणवीसांच्या प्रोटेक्शनमध्ये खोट्या नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरु होता. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने छापा टाकला त्यात १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या खोट्या नोट्या सापडल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मदत केली. खोट्या नोटांच्या या नेक्सकमध्ये आयएसआय पाकिस्तानकडून बांग्लादेशमार्गे संपूर्ण भारतात पसरवल्या जातात. या प्रकरणी मुंबई आणि पुण्यात दोघांना अटक झाली. पुण्यात इम्रान आलम शेख याला अटक करण्यात आली. पण या १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या जप्तीला आठ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. आरोपीला काही दिवसांनी जामीन मिळाला. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले नाही, असे नवाब मलिक म्हणाले.
नोटा कुठून आल्या याची चौकशी केली गेली नाही. कारण हे रॅकेट चालवण्यार्‍या लोकांना तत्कालीन सरकारचे संरक्षण होते. तो कॉंग्रेसचा नेता असल्याचा असल्याचे सांगण्यात आले. इम्रान आलम शेख हा हाजी अरफात शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेखला देवेंद्र फडणवीसांनी भाजपामध्ये आणून अल्पसंख्या आयोगाचा अध्यक्ष बनवले होते, असे मलिक यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!