Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडठाकरे सरकारला बदनाम करण्याची सुपारी बँकांनी घेतली नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर...

ठाकरे सरकारला बदनाम करण्याची सुपारी बँकांनी घेतली नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर नाही


बीड (रिपोर्टर)- गेल्या दोन महिन्यात बीड जिल्ह्यात अकरापेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पाचशे कोटींची नुकसान भरपाई दिपावलीपुर्वी पाठवली. मात्र बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आलेले पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यास आजपावेत दिरंगाई केल्याचे दिसून येत असून शेतकर्‍यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नसल्याने शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बँका जाणीवपुर्वक ठाकरे सरकार व जिल्हा प्रशासनाला बदनाम करण्यासाठी दिरंगाई करतात का? असा सवाल उपस्थित होत आहे.


अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर दिवाळीपुर्वी रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा सरकार आणि प्रशासनाने केली. त्यानुसार ३ नोव्हेंबरलाच बीड जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयांना ४३७ कोटी ५२ लाखांची रक्कम वितरीतही केली होती. तहसील कार्यालयानेही ही रक्कम तात्काळ बँकांन वर्ग केली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांना रक्कम वितरीत करण्यात आली होती. अनेक शेतकर्‍यांकडून खात्यात पैसे जमा झाले नसल्याची ओरड आल्याने दैनिक रिपोर्टरने महसूल प्रशासन आणि संबंधित बँकांना विचारणा केली असता ३ नोव्हेंबरलाच जिल्हाधिकारी कार्यालयाने ही रक्कम तहसीलदारा ंमार्फत बँकांना दिल्याचे सांगितले. बँकांनी मात्र याबाबत कामचुकारपणाचे कारण सांगत महत्वाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!