बीड (रिपोर्टर)- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी भरती करणार असल्याचा शासन जीआर काढत आहे. हा जीआर तात्काळ रद्द करावा, या माणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या मागण्णयांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा कंत्राटी पद्धतीने चालवायला देणे, इत्यादी लोकविघातक निर्णय रद्द करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेहच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अॅड. राहुल वायकर, जिल्हाध्यक्ष प्रा. महेंद्र मोरे, कार्याध्यक्ष अशोक तुपे, गणेश गवळी, अरबाज शेख, रंगनाथ फटक, जीवन घोलप, महेश नेवडे आदी उपस्थित होते.