Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडउद्या शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा 9 हजार विद्यार्थी देणार परीक्षा

उद्या शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा 9 हजार विद्यार्थी देणार परीक्षा


बीड (रिपोर्टर)- तब्बल तीन वर्षानंतर शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परिक्षा शहरातील 20 केंद्रांवर होत असून या परिक्षेला 9 हजार विद्यार्थी बसलेले आहेत. शिक्षण विभागाकडून या परिक्षेसाठी पुर्ण तयारी केली असून भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.

ही शिक्षक पात्रता चाचणी दोन सत्रात होत असून सकाळी प्राथमिक शिक्षक (डीएड विद्यार्थी) सकाळी दहा ते एक या वेळेत ही परिक्षा होईल व दुपारी माध्यमिक शिक्षक पदासाठी ज्यांनी आवेदन पत्र भरलेले आहेत. अशांसाठी दुपारी दीड ते साडेचार या वेळेत हा पेपर घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी तीन झोनल शिक्षण विभागाने तयार करून त्यावर नायब तहसीलदार या नायब अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागाचे नियंत्रण राहावे म्हणून दोन भरारी पथके नियुक्त केले असून हे भरारी पथके प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारुक यांचे नियंत्रण राहणार आहे. या परिक्षेसाठी सर्वस्वी नियोजन उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, विस्तार अधिकारी तुकाराम पवार ठाकूर यांनी केलेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!