बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेकडून शहरातील विविध भागांची वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने दुर्गंधी पसरू लागली. या दुर्गंधीमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. जिल्हा रुग्णालयातील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला नसल्याने हा कचरा रुग्णालय परिसरात तसाच असल्याने परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे.
शहरामध्ये स्वच्छतेबाबत नेहमीच तक्रारी असतात. नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी वेळेवर कचरा उचलत नाहीत त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साचत असतो. हा कचरा एका जागेवर साठवून ठेवला जातो, त्याठिकाणावरून कचरा नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन जात असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आला नसल्याने त्या कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली अहे. लागली