जालना (रिपोर्टर)- अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे 14 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा झाली होती.या सभेच्या जागेचे नियोजन करण्यासाठी 170 एकर परिसरातील शेतकर्यांनी आपल्या शेतात आलेले सोयाबीन व कपाशी सह लावलेली पिके उपटून सभेसाठी मैदान तयार करून दिले होते.अर्थात हातातोंडाशी आलेलं पीक उपटून फेकताना त्यांनी कुठलाच विचार केला नाही विचार केला तो समस्त मराठा बांधवांसाठी आरक्षणाचा.
या सभेला लाखोच्या संख्येने आलेल्या जनतेने सोयाबीन,कपाशीचे उभे पीक तुडवून सभेची जागा गाठली.सभा तर निर्विघ्न पार पडली पण गरीब बिचार्या शेतकर्यांचे हातचे पीक गेले. त्यांची ही अवस्था गावकर्यांना पहिली जात नाही.अश्यावेळी घनसावंगी तालुक्याच्या गुंज येथील शेतकरी गजानन साळीकराम तौर पुढे सरसावले असून आपल्या शेतातील पिके मोडून जागा दिली,अशा शेतकर्यांना रब्बी हंगामासाठी दहा क्विंटल गहू बियाणे व 21 बँग सरकी पेड घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील शेतकरी गजानन साळीकराम तौर यांच्याकडून देण्यात येणार आहे. ज्या काही शेतकर्यांनी आपल्या शेतातील खरिपाचे पिके काढून शेतजमीन दिली. अशा शेतकर्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून गुंज येथी शेतकरी गजानन तौर यांच्या वतीने शेतकर्यांना रब्बीची पेरणीसाठी 10 क्विंटल गहू बियाणे 55 बॅग व बैलासाठी 21 बॅग पेंड स्थानिक कमिटीकडे जमा करण्यात आली असून कोणकोणत्या शेतकर्यांचे पिकाचे नुकसान झाले ते कमिटी बघेल व त्या शेतकर्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून तौर यांनी शेतकर्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी कंबर कसलेल्या मराठा बांधवांची ही भावना वाखाणण्याजोगी असून परिसरात त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.