वडवणी (रिपोर्टर):- एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं यासह अन्य घोषणा देत वडवणी येथील बीएसएनएल टाँवरवर तीन तरुण चढले होते. समाज बांधवासह पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरुन आंदोलनकर्ते टाँवरवरुन खाली उतरले आहे.तर आरक्षण न मिळाल्यास आत्मदहन करणार आहोत अशी प्रतिक्रिया देखील पत्रकारांना दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाच्या माध्यमांतून लढाई लढत आहेत. जरांगे यांच्या सन्मानार्थ वडवणी येथील बाजार समिती आवारातील बीएसएनएल टाँवरवर एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं यासह अन्य घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंड हाती घेत हनुमंत शिंदे पाटील, भैय्यासाहेब खोसे आणि राज जाधव हे 30 ते 32 वयाचे तीन तरुण टाँवरवर चढले होते. हि वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि समाज बंधवासह पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. टाँवर जाऊन आरक्षण हिताच्या आणि सरकार विरोधी घोषणा देत आंदोलनकर्ते आक्रोश व्यक्त करत होते.तेव्हा घटनास्थळी वडवणीचे नगराध्यक्ष शेषेराव जगताप, युवा उद्योजक तथा नेते संतोष डावकर, युवा नेते अमरसिंह मस्के, भैय्यासाहेब मस्के, परमेश्वर मस्के सह आदि समाज बांधवासह पोलीस प्रशासन उपस्थित होते. यांनी चर्चा व विनवणी आणि विनंती करुन आंदोलनकर्ते हनुमंत शिंदे, भैय्यासाहेब खोसे आणि राज जाधव हे तिघे जण खाली उतरले व जरांगे पाटील यांच्या जिवातास आणि आरक्षण न दिल्यास आम्ही यापेक्षा हि आधिकच आंदोलन करु तसेच आत्मदहन देखील करु अशा ईशारा देखील आंदोलनकर्त्यानी दिला आहे. या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून नोटीस दिल्यानंतर सुटका करु अस घटनास्थळी पोलीस प्रशासन यांनी बोलून दाखविले आहे.