गेवराई, (रिपोर्टर) – मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आणि राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी गेवराई येथून मुस्लिम बांधवांच्या असंख्य गाड्यांचा ताफा आज सकाळी 11 वाजता रवाना झाला. दरम्यान सकाळी सर्व मुस्लिम बांधवांनी गेवराई येथील शास्त्री चौक येथील साखळी उपोषण आंदोलनस्थळी एकत्र येऊन या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले माऊली गंगाधर, सुहास दाभाडे या आंदोलन कर्त्यांचीसह समाज बांधवांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला.
यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठा आशा घोषणा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठी मुस्लिम समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे सोबत राहील असा विश्वास दिला. यानंतर त्यांनी आपल्या गाड्याचा ताफा घेऊन आनंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला याबाबत सर्व मुस्लिम बांधवांचे मराठा समाज बांधवांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
यावेळी मुफ्ती गयासोद्दीन जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली जमीअत उलमा-ए-हिंदचे तालुकाध्यक्ष हाफेज अनिस पठाण, ज्येष्ठ नेते शेख जमादार,ऍड शेख अब्बास अहमद, शेख जमादार, ज्येष्ठ पत्रकार काझी अमान, अय्युब बागवान, सय्यद शफी अत्तार, अब्दुल सत्तार कुरेशी, अब्दुल खालेक कुरेशी, शेख खाजा, बब्बूशेठ, खलील कुरेशी, शेख सालारभाई, हारून पटेल, मुनाफ कुरेशी, अलीमभाई ड्रायव्हर, शोएब आतार, अब्दुल रहीम भाई यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.