केज (रिपोर्टर) केज शहरातील विद्युत ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात अंधार आहे. याला कारणीभूत वीजवितरण कंपनी असून वेळीच ट्रान्सफार्मरची दुरुस्ती केली असती तर आज ही वेळ आली नसती.
विजेचा पुरवठा करणारे एक ट्रान्सफार्मर पाच दिवसांपुर्वी खराब झाले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला.
वीज नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ट्रान्सफार्मर आज आणण्यात आले असून आज संध्याकाळपर्यंत ते बसविण्यात येणार आहे. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल. वीज वितरण कंपनीने वेळीच ट्रान्सफार्मरची दुरुस्ती केली असती तर नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली नसती. वीजवितरण कंपनी वेळोवेळी ट्रान्सफार्मरसह इतर मशिनरीची दुरुस्ती करत नाही. तहान लागल्यावर विहीर खांदण्याचं काम अधिकारी करत असतात, अशा प्रतिक्रिया शहरवासियांकडून व्यक्त केल्या जात आहेत.