
गणेश सावंत -9422742810
प्रभू राम! एवढा शब्द जरी कानी पडला ना, तर जणू सत्य वचन कानी पडल्याचा अनुभव येतो. जय श्रीराम, असा नामजप केला तर मन शांती मिळते. रामाच्या नावात एवढी शक्ती आहे, भूतलातून ईहलोकी जातानाही आम्ही ‘राम नाम सत्य है, सत्य बोलो सत्य है’ असे म्हणत म्हणूनच आम्ही सातत्याने रामायणात आम्हाला केवळ आणि केवळ सत्य दिसते. सत्ता दिसतच नाही. जिथे राम नामाचा जय जयकार केला जातो, जिथे राम नाम जपलं जातो, तिथं सत्य काठोकाठ भरलेलं असतं. असा आमचा समज असायचा. मात्र आता ‘मुँह मे राम बगल में छुरी’ असेही पहायला मिळते. मग तिथे खरच राम असेल का? अशा लोकांकडे रामांचे विचार खरचं असतील का? राम वचनांची संहिता ते पाळत असतील का? जर वाल्याचा वाल्मिकी मरा मरातून होतो, तिथं सत्ता लालसी सत्याच्या मार्गावर जातील का? हा आमचा भाबडा प्रश्न. असो…
एक राजा, तीन राण्या, चार पती
प्रभू रामाचे रामायण एवढे लोकप्रिय का झाले? कणा-कणात आणि चरा-चरात प्रभू राम का दिसू लागले… रामायणाला जगाच्या पाठीवर अनन्यसाधारण महत्व कशामुळे प्राप्त झाले? या सर्वांचे उत्तर एकच ते म्हणजे रामायणात प्रमुख व्यक्ती मोजके आहेत आणि त्या व्यक्तिरेखाचे कर्तव्य-कर्म, त्याग-संघर्ष हा हिमालयाच्या उंचीपेक्षाही उंच आहे. अयोध्यातील महापराक्रमी राजा महाराज दशरथांना पुत्र नव्हता, का कुणास ठाऊक श्रीमंतांना आणि राजा -महाराजांना मुलच होत नाहीत, राजमहल गोपाळपुरा होण्यासाठी त्यांना अथांग प्रयत्न करावे लागते. राजमहलात चिलेपिले नसतात आणि झोपडीत मात्र चिल्यापिल्यांची वर्दळ असते. गल्ली-बोळात खंडीभर मुलं-मुली खेळताना दिसतात. ईश्वराच्या मनात नेमकं काय असतं, दारिद्रयात आणि संघर्षात असलेल्या जे स्वत:चं संगोपन करू शकत नाहीत अशांना पुत्र-पुत्री धन भरभरून द्यायचं आणि जे धनवान आहेत, जे स्वत:बरोबर समाजाचं संगोपन करू शकतात त्यांना पुत्र-पुत्री धन द्यायचंच नाही, पुत्र प्राप्तीसाठी दशरथ महाराजांनी यज्ञ केला. अखेर या यज्ञ देवाच्या कृपेने दशरथ महाराजांच्या तिन्ही राण्यांना पुत्र आहे. कौशल्याला राम, सुमित्रीला जुळे लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकयीला भरत. जेव्हा प्रभू रामाचा जन्म झाला, तेव्हा अयोध्या नगरीत आनंद उत्साहाचा कल्लोळ उडाला. दरबार आणि सारी अयोध्या नगरी सुशोभीत करण्यात आली. मंगल वाद्य वाजविली गेली, हत्तीवरून साखरपान वाटले गेले. सणोत्सवाचा तो दिवस उभयतांना वाटू लागला. दिवसांमागून दिवस जसे जाऊ लागले तसे अंगणात खेळणारे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या दोन जोड्या अयोध्या वासियांसाठी उत्सुकतेच्या ठरत राहिल्या.
प्रभू रामाला चंद्र हवा
प्रभू राम हे त्यांच्या बाललिलेचच ईश्वरतेचा साक्षात्कार देणारे ठरू पाहत होते. महाराज दशरथांच्या चार पुत्रांपैकी ज्येष्ठ पुत्र असलेले प्रभू राम रंगाने गहू वर्णाचे श्यामल होते. त्यांच्या जन्माबाबत संत तुळशीदासांनी म्हटले आहे, नवमी तिथी मधूमास पुणिता। सुकल पश्च अभिजीत हरी प्रिता ॥ प्रभू रामाचा जन्म ज्या दिवशी झाला ते चैत्र महिन्यातील सुक्ष्ल पक्षातील नवमी होती. अभिजीत नक्षत्र होते. महाराज दशरथांचे पुत्र तसे होते. राम गहुवर्णीय लक्ष्मण गोरा, भरत श्यामल तर शत्रुघ्न गोरा. या रंगांचे वर्णन खाडीलकरांनी आपल्या रामायणात सुंदर केले आहे. लहानपणी मुले असे काही हट्ट करतात की ते हट्ट पुरविता पुरविता माता पित्यांच्या नाकीनऊ येते. प्रभू रामांच्या हट्टाची गोष्ट अशीच सर्वश्रूत आहे. राम एकदा आकाशाच्या दिशेने खिडकीतून पाहत होते. माता कौशल्याला त्यांनी खुणवलं, आकाशाकडे बोट दाखवले आणि राम म्हणाले, माते मला चंद्र हवा आहे. राम हा दशरथाचा पुत्र आहे. तो महाराजांचा पुि आहे. तो जे मागेल ते देण्यासाठी सेवक तत्पर असायचे. जेव्हा खेळणी मागेल तेव्हा खेळणी मात्र आज प्रभू रामांनी चंद्र मागितला आणि तो हट्ट सोडण्यास ते तयार नव्हते. तेव्हा अयोध्येचे प्रधान सुमंत हे मोठे चतूर होते. त्यांनी एक मोठा आरसा आणला आणि तो जमीनीवर ठेवला. चंद्राचं प्रतिबिंब त्या आरशात उमटलं तेव्हा प्रभू रामाला तो चंद्र दाखवण्यात आला. हट्टाला पेटलेले राम समाधानी झाले. कौशल्या खळखळून हसल्या. अयोध्यानगरीत आणि महाराज दशरथांच्या महालात या चार पुत्रांमुळे जणू गोपाळपुरा झाला होता. हसतं खेळतं नंदनवन ते महाल वाटत होते. इकडे त्या चौघांचे लाड पुरवले जात होते मात्र तिथे अश्वत्थामाचा हट्ट जेव्हा आठवतो तेव्हा सामाजिक आर्थिकतेची दरी तेव्हा आणि आजही अशी असल्याचे आम्हाला खासकरून जाणवते. अश्वत्थामा हे द्रोणाचार्यांचे पुत्र. द्रोणाचार्य हे गरीबीने रंजलेगांजलेले एकदा अश्वत्थामा आपल्या मित्रांसमवेत खेळत होते तेव्हा त्यांच्या मिनिे आम्ही आज दूध पिऊन आलो, असे म्हटले. अश्वत्थामा घरी आला, आणि म्हटला, आई मला दूध प्यायचं, मात्र गोठ्यात गाई नाही, अठराविश्व दारिद्रय आहे, तरी आई ती आई असते. अश्वत्थामाच्या आईने पिठात पाणी ओतलं आणि ते पांढरं पाणी दूध म्हणून अश्वत्थामाला दिलं. तेवढ्यात द्रोणाचार्य आले, त्यांनी ती परिस्थिती पाहिली. डोळ्यात अश्रू आले खरे, परंतु
राजा आणि रंकालाही
दु:ख आणि आनंदाचे अश्रू
रामायणातच पहायला मिळतात, ऐकावयाला मिळतात, अनुभवयाला मिळतात. अठराविश्व दारिद्रयामुळे दूध म्हणून अश्वत्थामाला पाणी पाजले. या दु:खात द्रोणाचार्यांनी काही काळ अश्रू ढाळले आणि इकडे राजमहलात हसत खेळत राहिलेले राम अखेर मोठे होत चालले तेव्हा अचानक महर्षी विश्वामित्र तिथे आले आणि दशरथाच्या काळजाचा तुकडा असलेल्या प्रभू रामाला आपल्याबरोबर नेण्याची परवानगी मागितली. नासधूस करणार्या राक्षसांचा नितपात करण्यासाठी विश्वामित्रांना राम हवे होते. विश्वामित्र हे शस्त्र विद्येत, अस्त्र विद्येत पारंगत असल्याने प्रभू रामाला ते बला आणि अतीबला ही विद्या शिकवणार होते. विश्वामित्र प्रभू रामांना सोबत घेऊन गेले. तेव्हा रामांना त्यांचे सामर्थ्य वापरण्याचा पहिला प्रसंग आला. त्यांनी नरभक्षक ताटका राक्षसणीस आपल्या धनुष्य बाणाने ठार केले. त्या काळात स्त्रीला ठार करणे हा अधर्म होता, आता काय करावे, तेव्हा महर्षी वाल्मिकी यांनी अत्यंत मोलाचा नियम सांगितला. हा नियम आजही सर्वांसाठी सर्वकाळासाठी लागू आहे. स्त्रीचा वध करणे हा अधर्म आहे पण सकलसृष्टीलाच उप्रदव करणारा पशू-पक्षी, पुरुष-स्त्री कोणी असेल तरी ठार करावे, म्हणूनच आपण पिसाळलेले श्वान असो अथवा गुंडगिरी नरभक्षक म्हणा किंवा आजच्या भाषेत कसाब म्हणा, त्याला फाशी दिलीच. क्रमश ….