Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeकोरोनाकोरोना वाढला; जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयाचा आढावा घेतला, राधाबिनोद शर्मा दोन तास जिल्हा रुग्णालयात

कोरोना वाढला; जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयाचा आढावा घेतला, राधाबिनोद शर्मा दोन तास जिल्हा रुग्णालयात


रुग्णालयाची केली पाहणी, डॉक्टरांना सूचना, अधिकारी-कर्मचार्‍यांसोबत घेतली बैठक
बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी हरकतमध्ये येत आज सकाळी जिल्हा रुग्णालयाची तब्बल दोन तास पाहणी केली. कोविड वार्डासह ओपीडी आणि नव्या इमारतीची पाहणी करत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांची महत्वपुर्ण बैठक घेऊन कोविड काळात रुग्णांना कुठला त्रास होणार नाही, कोविडचा प्रादुर्भाव वाढणार नाही, सर्व सुविधा रुग्णांना यथोचित मिळाव्यात, कामात कुचराई होऊ नये यासह अन्य महत्वपुर्ण सूचना दिल्या. आज दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अमलबजावणी पाहण्यासाठी पुन्हा पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा रुग्णालयात येणार असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

55 2


गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा आकडा हा शंभरी पार करत असल्याने कोरोना जिल्ह्यात हातपाय पसरवत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह अन्य काही शहरात कोरोनाने उग्ररुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. ती परिस्थिती जिल्ह्यावर ओढवू नये म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांनी आज सकाळी जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन रुग्णालयाच्या कानाकोपर्‍यासह कोविड वार्ड आणि ओपीडीची पाहणी केली. दोन तासांच्या या पाहणीनंतर उपस्थित डॉक्टर, कर्मचार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी सूचना दिल्या. नव्याने कोविड ओपीडी सुरू करण्याचे आदेश दिले. कोविडच्या रुग्णाला कुठला त्रास होणार नाही, सर्व उपचार वेळेवर आणि व्यवस्थीत होतील याची दक्षता घेण्याचेही सांगितले. ऑक्सीजन, औषधं याचीही पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये उपस्थित डॉक्टरांसह बैठक घेऊन सूचना केल्या. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, आर.एम.ओ. डॉ. राठोड, डॉ. आव्हाड, डॉ. शिंदे यांच्यासह रुग्णालयातील अन्य डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!