सीईओकडे गावकर्यांचे निवेदन, चौकशीची मागणी
बीड, (रिपोर्टर)ः- तालुक्यातील काळेगाव हवेली ते काळेगाव तांडा या दरम्यान डीपीडीसीच्या अंतर्गत खडीकरण व मुरूम करणाच्या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यावर नुस्ताच चिखल झाला. दोन दिवसापुर्वी पाऊस पडल्याने नागरीकांना रस्त्याने जाता येत नाही. रस्त्याचे काम दर्जेदार केले असते तर आज ही अवस्था झाली नसती. रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषी विरोधात कारवाई करावी अशी मागणी येथील नागरीकांनी जि.प.च्या सीईओकडे केली आहे.
काही दिवसापुर्वी काळेगाव तांडा येथील रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याचे काम व्यवस्थीतपणे झाले नाही. पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर नुसता चिखल झाला. चिखलामुळे नागरीकांनी येण्या जाण्यास त्रास सहन करावा लागतो आहे. मोटारसायकल अक्षरशःबैलगाडीमध्ये टाकून न्यावी लागत आहे. हा रस्ता गुत्तेदार चौरंगनाथ पवार यांनी केलेला आहे. त्यांना याबाबत विचारणा केली असता ते अरेरावीची उत्तरे देतात. रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषीविरोधात कारवाई करण्याची मागणी दत्ता पवार, बंडू राठोड, विलास पवार,नामदेव पवार, छगन राठोड, रामेश्वर पवार नारायण पवार यांच्यासह आदींनी जि.प.च्या सीईओकडे केली आहे.










