• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

केज (रिपोर्टर): भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यवसायिकाचा गेल्या दोन दिवसांपूर्वी खून करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद केज शहरासह तालुकाभर उमटताना दिसून येत असून यातील आरोपींना अटक करण्यासाठी दोन दिवसांपासून लोक रस्त्यावर उतरले आहेत. अद्यापपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले नाही. संतप्त झालेल्या नागरिकांनी आज केज शहर बंद करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडल्याने या भागातील पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. त्याच दरम्यान एक रिकामी अ‍ॅम्ब्युलन्स आंदोलनस्थळी आली, त्यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी त्या अ‍ॅम्ब्युलन्सची मोडतोड केली. त्यामुळे तणाव अधिकच वाढत गेला. या प्रकरणात एकूण नऊ आरोपी असून 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्याचबरोबर या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, ही प्रमुख मागणी संतप्त आंदोलकांची प्रामुख्याने आहे. केज शहर आणि तालुकाभरात सध्या तणावपूर्ण शांतता असून याच प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत हे दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान बैठक घेत असल्याचे सांगण्यात येते.


   केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यवसायिक विलास घुले यांचा खून करण्यात आला. या घटनेला दोन दिवस उलटले तरी सर्व नऊ आरोपींना केज पोलिसांनी अटक केलेली नाही. आरोपींच्या अटकेसाठी कालपासून शहरामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज टाकळी ग्रामस्थ व घुले यांच्या नातेवाईकांनी केज शहर बंदची हाक दिली होती. व्यापार्‍यांनी आपआपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. शहरातील शिवाजी चौकामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावरर निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सात अरोपींना दुपारपर्यंत ताब्यात घेतले होते. आणखी दोन आरोपी फरार होते. या दोन्ही आरोपींना अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांची होती. दुपारी एक वाजेच्या दरम्यान आंदोलनस्थळी एक रिकामी अ‍ॅम्ब्युलन्स आली होती. या अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याने शहरात अधिकच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सर्व आरोपींच्या अटकेसाठी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात येणार होता. या आंदोलनस्थळी पोलीस महानिरीक्षक भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

खासदार पुत्रावर गुन्हा दाखल करा
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या पूर्वनियोजीत असल्याचा आरोप गुले यांच्या नातेवाईकांकडून होत असून या खून प्रकरणात खा. बजरंग सोनवणे यांच्या पुत्रावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी या आंदोलनादरम्यान अनेकांनी बोलताना केली. मयताच्या घरातल्या लोकांनी जाहीरपणे खासदार पुत्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Previous Post

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

संबंधित बातम्या

केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

चार मुलांची आई दोन मुलांच्या बापासोबत फरारतीन मुलांना घरी सोडून एक मुलाला घेतलं सोबत,  केज तालुक्यातील घटना

by गणेश सावंत
May 8, 2026
केज

मोठी बातमी -मस्साजोग ग्रामपंचायतीत सत्ता बदल; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी

by गणेश सावंत
April 29, 2026
केज

केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेत ४.२४ कोटींचा घोटाळा; माजी मुख्याधिकाऱ्यासह सहाजणांवर गुन्हा

by गणेश सावंत
April 25, 2026
Please login to join discussion

ताज्या बातम्या

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

June 23, 2026

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा
  • शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला
  • गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?