बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबर अखेर प्रत्येक वर्षी वार्षिक सरासरी 699.34 इतका मि.मी. पाऊस होत असतो. मात्र 13 जुलै 2022 पर्यंत यावर्षी 304.6 मि.मी. पाऊस झालेला आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस ही पिके अनेक ठिकाणी पाण्याखाली आहेत. काही भागामध्ये हा पाऊस सात ते आठ दिवस होता. यामध्ये प्रामुख्याने माजलगाव, अंबाजोगाई तालुक्यांचा काही भाग आहे. बीड जिल्ह्यामध्ये 48 टक्के पाऊस झाला तरी बीड जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प कोरडे असल्याची माहितीही आपत्ती व्यवस्थापनाने दिलेली आहे. तर होळ आणि बनसारोळा या ठिकाणी एका दिवसात अतिवृष्टीपेक्षा जास्त पाऊस झाला असून या ठिकाणी 89.8 मि.मी. इतकी पावसाची नोंद झालेली आहे.