
आष्टी शहर तिरंगामय
पाकिस्तान वाल्यांनी नाद करावा, माज जिरवायला सैन्यदल तयार आहे, सैनिका बद्दल कायम आदर राहिला पाहिजे – आ. सुरेश धस
आष्टी ( रिपोर्टर):- ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर आज रविवार दि.18 मे रोजी आष्टी शहरांमध्ये आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते यावेळी आष्टीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारत माता की जय जयघोषाने परिसर दणाणून गेला होता पाकीस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या आष्टी शहरातून तब्बल 1 ते 2 किलोमीटर तिरंगा ध्वज हातात घेऊन निघालेल्या रॅली ने आष्टी शहर तिरंगामय झाले होते.पाकिस्तान वाल्यांनी नाद करावा माज जिरवायला सैन्यदल तयार आहे, सैनिका बद्दल कायम आदर राहिला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी आ. सुरेश धस यांनी केले.

पाकिस्तान विरोधात भारताने केलेली कारवाई आणि भारतीय लष्करांचे कौतुक करीत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी आष्टी शहरात आ.सुरेश धस यांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली होती.आष्टीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद देशभक्ती घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तरास सलाम करण्यासह पाठिंबा देण्यासाठी देशभरात तिरंगा देलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आष्टी शहरातही तिरंगा रॅली हा उपक्रम राबविण्यात आला तब्बल दोन किलोमीटर लांब तिरंगा ध्वज हातात घेऊन नागरिकांनी ओसंडून वाहणारा उत्साह पाकिस्तान विरुद्ध तीव्र संतापाच्या घोषणा देत भारतीय सैन्य दलाचे प्रोत्साहन वाढवत आष्टी शहरात रविवारी सकाळी आष्टी पंचायत समिती हुतात्मा चौक येथे जवानांना अभिवादन करुन भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. या माध्यमातून भारतीय जवानांना सामूहिक सलामी देण्यात आली जवानांविषयी सर्वांमध्ये आदर असला पाहिजे भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकिस्तान्यांचे मनसुंबे धुळीस मिळवले भारतीय जवानांचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनीय असल्याचे मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले. आष्टी पंचायत समिती कार्यालयाच्या प्राणांना पासून तिरंगा रेल्वे ला सुरुवात झाली तब्बल दोन किलोमीटर तिरंगा ध्वज हातात घेऊन तिरंगा टोप्या परिधान केलेले नागरिकांमुळे परिसर तिरंगामय झाला होता.









