बीड/ मुंबई (रिपोर्टर)ः- विधान परिषद निवडणूकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधान परिषदेमध्ये झाला. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधान परिषदेच्या सर्व सदस्यांसह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित होते. दोन पराभवानंतर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे यांनी आज आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये शपथ घेतली. उद्यापासुन त्या बीड दौर्यावर असून सर्व प्रथम भगवान भक्तीगड, नारायणगडाचे दर्शन घेवून बीड सह परळीतील महापुरूषांच्या पुतळ्याला अभिवादन, वंदन करणार आहेत.
गेल्या आठवडाभरापुर्वी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडूका झाल्या. या निवडणूकीमध्ये भाजपाचे अमित गोखले, परिणय फुके, सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे, योगेश टिळेकर तर शिंदे गटाचे क्रृपाल तुमाने, भावना गवळी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे, राजेश विटेकर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उध्दव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे या निवडणूकीमध्ये निवडूनआले. आज सकाळी या 11 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधान परिषदेमध्ये पार पडला. विधान परिषदेच्या उपभापती निलम गोरे यांनी या सर्व सदस्यांना शपथ दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबदास दानवे हे उपस्थित होते. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत परळीतून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे या पाच वर्षे सातत्याने चर्चेत राहिल्या. तेव्हा 2024 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. मात्र दुर्देवाने बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या एक महिन्यात विधान परिषदेसाठी भाजपाने पंकजा मुंडेंना निवडणूक रिंगणात उतरवले. या निवडणूकीमध्ये पंकजा मुंडे विजयी झाल्या . आज त्यांनीही आमदार म्हणुन विधान परिषदेमध्ये शपथ घेतली. भाजपाचे तरूण चेहरे हे विधान परिषदेमध्ये आता दिसणार आहेत. त्यामध्ये योगेश टिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोखले, सदाभाऊ खोत हे आक्रमक वक्ते म्हणुन परिचित आहेत.
चौकट
पंकजा घेणार भगवान भक्तीगड, नारायण गडाचे दर्शन
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे ह्या उद्या सोमवारी बीड जिल्हा दौर्यावर असुन त्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रथमचः आपली जन्मभुमी आणि कर्मभुमी असलेल्या बीड जिल्ह्यात येत आहेत. या दौर्यात हारे तुरे नको, सत्कार नको, माझ्या स्वागताचा बडेजाव करू नका असे पंकजांनी म्हंटले आहे. सकाळी भगवान बाबांची जन्मभुमी असलेल्या श्रीक्षेत्र भगवान भक्तीगड येथे त्या दर्शन घेतली. तेथुन दुपारी 12 वा.श्रीक्षेत्र नारायणगड नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बीडमध्ये अभिवादन करतील पुढे त्या सायं. 4 वा. गोपीनाथ गडावर स्व.गोपीनाथ मुंडेंच्या समाधीची नतमस्तक होत. सायं. 5 वा. परळीमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहे आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.