गेवराई (रिपोर्टर) नाशीक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने पैठणच्या नाथसागरात पाण्याची पातळी जुलैच्या शेवटच्या आठवड्यातच 80.57 टक्के झाली असून फुटामध्ये 1 हजार 518.23 एवढी पाणी पातळी झाली आहे. त्यात आवक 30341 क्युसेसने चालू असून जलविद्युत केंद्रातून गोदावरी पात्रामध्ये 7 हजार 90 क्युसेसने पाणी सोडले जात आहे तर कालव्याद्वारेही पाणी सोडण्यात येत आहे.
आपेगाव उच्च पातळी बंधार्यात 98.41 टक्के पाणी जमा झाले असून पाणलोट क्षेत्रात होणार्या पावसाच्या पाण्याची आवक बघता आज सकाळी अकरा वाजता बंधार्याचा एक दरवाजा उघडून नदीपात्रात 7090 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. येणार्या पाण्याच्या आवकनुसार सोडण्यात येणार्या पाण्यात वाढ होऊ शकते. तरी सदर कालावधीत कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवीत व वित्त हानी होऊ नये याकरिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.