गेवराई, (रिपोर्टर)ः- शेतात बांधलेल्या दोन वासरावर हिंस्र प्राण्याने चढवत हे दोन्ही वासराचा फडशा पाडण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. सदरील घटना कोलतेवाडी येथे घडली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकार्याने घटनास्थळी येवुन पाहणी केली.वासराचा फडशा पाडणारा तडस किंवा बिबट्या असून शकतो असा अंदाज वनविभागाने बांधला आहे.
कोलतेवाडी येथील शेतकरी विष्णू बाजीराव मुळूंक यांच्या शेतात बांधलेल्या दोन गाईच्या वासराचा रात्री फडशा पाडण्यात आला आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी वनविभागाचे सुनिल टाकणखार, लक्ष्मण गाडे, पोपट वीर, सुभाष टाकणखार यांनी जावून पाहणी केली. वासराचा फडशा पाडणारा तडस किंवा बिबट्या असून शकतो असा अंदाज वनविभागाने बांधला असून शेतकर्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे