चिंचवणच्या तरुणास पुणेच्या इसमाने पावणे सात लाखास फसविले ; वडवणी पोलीसात गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर):- चिंचवणाच्या तरुणास नौकरीचे खोटे आणि बनावट नियुक्तीचे आदेश तयार करुन पुणेच्या एका इसमाने तब्बल पावणे सात लाख रुपयास फसविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्याच्या लोहगांव परिसरात राहणाऱ्या इसमा विरोधात वडवणी पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचवण येथील रहिवाशी आणि शेतकरी असणारे सिताराम प्रभु बडे (वय 40 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे कि, भाऊ अंगद बडे यास पुणे येथील लोहगांव परिसरातील नदी दिबाकर या व्यक्तीने नौकरीचे अमिष दाखवून व नौकरीचे खोटे बनावट नियुक्ती आदेश स्वताच तयार करुन अंगद बडे यांच्याकडून 6,75,000 रुपये घेतलेली रक्कम परत न करता विश्वासाने ठेवलेल्या पैसाचा अपहार करुन भाऊ अंगद बडे यांची फासवणुक केली आहे. हा प्रकार दि.10 आँगस्ट 2023 ते दि.5 डिसेंबर 2023 दरम्यान घडला आसून एसडिपीओ माजलगांव यांची मंजुरी घेऊन काल गुन्हा दाखल केला असून आरोपी नदी दिबाकर रा.लोहगांव पुणे याच्या विरोधात गु.र.नं .32/2025 कलम 420,406,465,467, 468 भांदवि नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोह. केदार हे करत आहेत.