अपघाताच्या घटना वाढण्याची शक्यता
पालकांवरच कारवाई करण्याची मागणी
पात्रुड, (रिपोर्टर)ः- सध्या वाहनांची संख्या भरमसाठ वाढली असल्याने वाहनकोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यात भरीसभर म्हणून शहरात अल्पवयीन शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी हातात स्कूटर, मोटारसायकल घेऊन सुसाट पळविताना दिसत आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अल्पवयीन मुले वाहन चालविताना दिसल्यास त्यांच्या पालकांवरच कारवाई करण्याचा सूर शहरवासीयांमधून उमटत आहे.
विनापरवाना सुसाट वाहन चालविणारे अल्पवयीन मुले तसेच मार्गावरील पादचारी वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी, वाहनधारक व पादचार्यांचा जीवदेखील धोक्यात येण्याची भीती सदर वाहतुकीमुळे निर्माण होत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यार्थ्यांच्या हातात वाहन देणार्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायदा व नियमात असली तरी कारवाईची कठोरतेने अंमलबजावणी होत नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढत आहे. सुसाट धावणारी ही वाहने मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याने एखादेवेळी भीषण अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुचाकी वाहनावर किती प्रवासी असावेत याचे भानदेखील हे अल्पवयीन विनापरवाना वाहनचालक ठेवत नसल्याचे दृष्टीस पडत आहे.
पोलिसांनी मोहीम सुरू करण्याची मागणी
माजलगाव तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये 18 वर्षाखालील अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक, मालक व पालक यांच्यावर मोटार वाहन कायदा व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मोहीम पोलिस यंत्रणेने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. याप्रकरणी संबंधित पालकांवर गुन्हे दाखल करून न्यायालयात खटला दाखल करावा, अशी नागरिकांतून मागणी करण्यात येत आहे.
तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
अशा गुन्ह्यात तीन वर्षापर्यंत शिक्षा व 25 हजार रुपये दंड व अल्पवयीन मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही. अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. शालेय जीवनातच मुलांना वाहतुकीचे नियम शिकविले जातात. मग शाळकरी मुलांना शाळेत महाविद्यालयात वाहन न आणण्याची जबाबदारी जेवढी पालकांची आहे तेवढीच शाळा व्यवस्थापनाचीही आहे. जो विद्यार्थी शाळेत यांत्रिक दुचाकी वाहन आणत असेल त्यास वेळीच आळा घालण्याचे कर्तव्य शाळा व्यवस्थापन समितीचे असल्याने या समितीने संबंधित पालक आणि विद्यार्थी यांना शाळेत सदर वाहन आणण्यास प्रतिबंध घालणे गरजेचे आह









