अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद
बीड (रिपोर्टर): शहरातल्या विविध भागांमध्ये रात्रीच्या दरम्यान अंधार असतो. नगरपालिका प्रशासन पोलवरील नादुरुस्त पथदिवे बसवत नाही. पांगरी रोड लगत असलेल्या सारनाथ कॉलनी भागात गेल्या काही महिन्यांपासून अंधार आहे. या भागातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्री ये-जा करणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. न.प.ने येथील पथदिवे तात्काळ बसवावे, अशी मागणी होत आहे.
बीड शहरातील प्रत्येक पोलवर नगरपालिकेच्या वतीने पथदिवे बसविण्यात आले मात्र बहुतांश पोलवरील पथदिवे बंद पडलेले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्री-अपरात्री ये-जा करणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच अंधाराचा फायदा घेऊन चोरटे चोर्या देखील करू शकतात. पांगरी रोह लगत असलेल्या सारनाथ कॉलनी या ठिकाणचे पथदिवे गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. दिवे बंद असल्याने येथील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. न.प. प्रशासनाने या भागातील दिवे तात्काळ बसवावे, अशी मागणी केली जात आहे.








