
राष्ट्रीय समाज पक्षाचे धरणे आंदोलन
बीड, (रिपोर्टर)ः- शेतकर्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या दिवसेदिवस वाढत आहेत. शेतकर्यांना आधार देण्याचे काम राज्य सरकारने करायला हवे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब मतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाला प्रा.सुशिला मोराळे सह आदींनी समर्थन दिले आहे.






