बीड, (रिपोर्टर)ः- राज्य सरकारने जन सुरक्षा विधेयक आणले असून हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज परळी तहसिल कार्यालयासमोर जन सुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या वतीने तिव्र निदर्शने करण्यात आली आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने जन सुरक्षाविधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. राज्य सरकारने आणलेला जनसुरक्षा हा कायदा सर्व सामान्य नागरीकांना भारतीय राज्य घटनेने दिलेल्या मुलभुत अधिकारी आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज कृती समितीच्या वतीने परळी तहसिल कार्यालयासमोर तिव्र निदर्शन करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद बहादुर, अजय बुरांडे, वसंत मुंडे, उत्तमराव माने, पी.एस.घाडगे, आदर्श जंगले, मिलिंद घाडगे, प्रकाश मुंडे, भोजराज पालेवाल, श्रीकांत पाथरकर, खाडे, ज्ञानबा गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.










