
बीड, (रिपोर्टर)ः- ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीर रित्या होत असलेली घुसखोरी थांबविण्यात यावी या मागणीसाठी आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान या वेळी जीआर फाडून शासनाचा निषेध करण्यात आला.
शासनाने एसईबीसीच्या माध्यमातून मराठा समाजाला अगोदरच 10 टक्के आरक्षण दिलेले आहेत.
त्यामुळे ओबीसीमध्ये नव्याने घातलेल्या 59 लाख नोंदी तात्काळ रद्द कराव्यात, न्या.शिंदे समिती पक्ष पातीपणे काम करत आहे त्यामुळे ही समिती बरखास्त करण्यात यावी. दि 02सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली आहेत. या वेळी सुभाष राऊत, गणेश जगताप, रफिक बागवान, केशव तांदळे, माऊली सिरसाट, संदीप बेदरे, बी.एम. पवार, नितीन जायभाये, निखील शिंदे, किशकिंदा पांचाळ, लक्ष्मण गुंजाळ, मिनाक्षी देवकते, पी.टी. चव्हाण, मयुरी बांगर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.








