
तपेनिमगाव ( दत्तबाग ) मध्ये आठ जनावरे दगावली
शेतकरी पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण पशु वैद्यकीय विभागाने सहकार्य करावे पशु पालकांची मागणी

टाकरवण (रिपोर्टर):-तपेनिमगाव दत्तबाग येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने शेतकर्यांच्या जनावरांना चावा घेतला. त्यामुळे रेबीज होऊन.आज पर्यंत आठ ते दहा जनावरे दगावली आहेत.कुत्र्यांने चावा घेतलेले अजून अनेक जनावरे गंभीर जखमी आहेत.जनावरे दगावल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर.दत्तबाग शिवारात या पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याने.शेतकरी पशुपालक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
गेवराई तालुक्यातील दत्तबाग येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे.शेतात गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशी शेळी वासरे यांच्यावर हल्ला करून चावा घेतलेले आठ ते दहा जनवरे दगावले आहेत.शेतकर्यांनी जनावरांना रॅबिज चे लशीकरण केले जनावरांना वाचवायचा प्रयत्न केला मात्र.तरीही रेबीज झाल्यामुळे जनावरे दगावली आहेत.भीमराव धायगुडे (बैल), संतोष शिंदे(बैल), किसन चोपडे (बैल), त्रिंबक शिंदे (शेळी), मदन वाघमोडे (म्हैस), अशोक चोपडे (गाय), लक्ष्मण चोपडे(शेळी) गणेश चोपडे(बैल) सह इत्तर शेतकर्यांच्या जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज होऊन आठ ते दहा जणवारे दगावली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झाले आहे. मागील आठ दहा दिवसापासून परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ माजवला आहे त्यामुळे शेतकरी पशुपालकांमध्ये भीतीच वातावरण पसरले. तर नागरिकाही भयभीत झाले आहेत. या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यानि केली जात आहे.








