
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने

बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी जनसुरक्षा विधेयक आणले असून हे विधेयक घटनाविरोधी असून या विधेयकामुळे लोकशाहीस बाधा निर्माण होऊ शकते. राज्य सरकारने सदरील विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी महाआघाडीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात तिनही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आणलेले आहे. या विधेयकाला पुर्वीपासून विरोध होत असतानाही राज्य सरकारने विधेयक मंजूर करून घेतले. जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणण्यात आले असल्याचा आरोप महाआघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. सदरील हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी महाआघाडी व डाव्या पक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. या वेळी आ. संदीप क्षीरसागर माजी आमदार उषा दराडे, सय्यद सलीम, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, राजेंद्र मस्के, हेमाताई पिंपळे, काँग्रेसचे बजगुडे, के.के. वडमारे, खुर्शीद आलम, गणेश राऊत यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.








