
छळाला कंटाळून महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
बीड (रिपोर्टर): कांद्याचा व्यापार करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन का येत नाही या कारणावरून एका विवाहित महिलेचा सासरच्या मंडळीकडून छळ केला जात असे. या छळाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे घडली.
सोनाली बाळू वनवे या महिलेचा गेल्या काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळीकडून महिलेचा छळ होऊ लागला. कांद्याचा व्यापार करण्यासाठी माहेरहून पैसे आण, असा तगादा सोनाली हिच्याकडे लावला जात असे. पैसे आणत नसल्याने सदरील महिलेस वारंवार त्रास दिला जात असे. या त्रासाला कंटाळून सदरील महिलेने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात पती अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, सासू प्रतिभा गर्जे यांच्या विरोदात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








