
विमा धारक शेतकर्यांसाठी ई पीक पाहणी बंधनकारक
बीड, (रिपोर्टर)ः- 20 सप्टेंबरपर्यंत शेतकर्यांनी आपली ई पीक पाहणी करून अपलोड करणे गरजेचे होते मात्र अनेक शेतकर्यांनी अद्यापर्यंत ई पीक पाहणी केलेली नाही. म्हणून याची मुदत दहा दिवसांनी वाढत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे.
ज्या शेतकर्यांनी आपल्या पीकांचा विमा उतरविला आहे. त्यासाठी ई पीक पाहणी करून आपल्या शेत पिकांचे झालेले नुकसान या द्वारे संबंधित कंपनीला अॅपद्वारे अपलोड करून तक्रार करावयाची असते. त्यानंतर ही ई पीक पाहणी शेत पिकांचे नुकसान झाले तर सरकार ही ईपीक पाहणीच्या आधारेच शेतकर्यांला मदत देत असते. यामुळे ई पीक पाहणी महत्वाची आहे. ज्या शेतकर्यांनी अद्यापर्यंत आपल्या शेत पिकांचे शेतात जावून ईपीक पाहणी केलेली नाही त्यांनी ई पीक पाहणी करून ते अॅपवर अपलोड करावे असे आवाहन बीड तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.









