
1 नोव्हेंबरला राज्यात उसतोडणीला सुरूवात होणार
ीड, (रिपोर्टर)ः- यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा फटका शेती पिकांना बसला. नद्यांना पुर आले होते. अतिरिक्त पावसामुळे रस्ते खरा झाले होते. उसाच्या फडात काहीदिवस पाणी असल्यामुळे यंदा उसतोडणीचा हंगाम लांबविण्यात आला. 1 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील सहकारी साखर कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. दिवाळीचा सण झाल्यानंतर मजूर उसतोडणीसाठी कारखान्याकडे कुच करू लागले आहेत. दररोज अनेक वाहने बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जात असल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे मोठेनुकसान झाले. रस्ते खराब झाले, नद्यांना आजही पाणी वाहत आहे. उसाच्या फडात काही दिवस पाणी राहणार असल्याने यंदाचा उस तोडणीचा हंगाम लाबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 1 नोव्हेंबरपासून राज्यभरातील कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. दरवर्षी उसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडात होत असते यंदा मात्र मजुरांची दिवाळी गावाकडे झाली आहे. आज 25 ऑक्टोंबर असुन येत्या पाच दिवसात कारखाने सुरू होणार असल्याने मजुर उसतोडणीला निघू लागले आहेत. दररोज ट्रॅक्टर, ट्रकद्वारे मजुर कारखान्याकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सर्वांधिक उसतोड मजुर बीड जिल्ह्यात आहेत. हे मजुर महाराष्ट्रासह कर्नाटक या राज्यातही उसतोडणीसाठी जात आहेत. मजुर उसतोडणीला जावू लागल्याने डोंगरी भागातील गावे ओस पडू लागले.








