कृषीमंत्र्यांचे परळीत राष्ट्रगाण
सिरसाळ्यानजीकच्या शिव मंदिरात रुद्राभिषेक; देशवासियांना सुखी ठेवण्याचे साकडे
बीड, (रिपोर्टर)ः-शेतकर्याचे उत्पन्न वाढविण्याचे काम ग्लोबल विकास ट्रस्टने केले असून या ट्रस्टचे काम संपूर्ण हिंदूस्थानात घेवून जाणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी म्हंटले. ते बीड जिल्ह्यातील सिरसाळा या ठिकाणी ग्लोबल विकास ट्रस्टचे मयंक गांधी यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. तत्पुर्वी शिवराज चौहान यांनी सिरसाळ्या पासून जवळ असलेल्या एका शिवमंदिरात जावून रूद्राभिषेक केला व देशवासियांचे कल्याण सुख समृद्धी, खुशहालीची कामना केली.

ग्लोबल विकास ट्रस्टचे मयंक गांधी यांनी बीड जिल्ह्यातल्या सिरसाळा या ठिकाणी शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. आज सकाळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी परळी येथे राष्ट्रगान गायिले. या वेळी धनंजय मुंडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. तेथून ते शेतकरी संवाद मेळाव्याकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी सिरसाळ्यापासून काही अंतरावर असलेल्या शिवमंदिरामध्ये रुद्राभिषेक केला. या वेळी शिवशंभोसमोर नतमस्तक होत देशवासियांसाठी कल्याण, सुखसमृद्धी, खुशहालीचे साकडे घातले. आयोजीत शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मीकेंद्रीय कृषीमंत्री म्हणजे लई मोठा असे नाही. मीही आपल्यातलाच आहे, जीवन जगणं त्यालाच म्हणतात जो दुसर्यासाठी जीवन जगत असतो. इथला पाण्याचा प्रश्न पाहिल्यानंतर आपण केवळ चर्चा करतो, सरकार काहीतरी करील, याची अपेक्षा करतो. कोणीतरी येईल आणि प्रश्न सोडविल, असंही आपण पाहतो, परंतु कोणीतरी पुढे आलं, सर्वांनी एकीचं बळ दाखविलं तर चमत्कार होतो. तो चमत्कार सिरसाळ्यात पाहायला मिळाला. लोकशाहीमध्ये मंत्री हा लोकसेवक असतो. असं म्हणत ग्लोबल विकास ट्रस्टचे कौतुक करताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की, शतेकर्यांचे उत्पन्न वाढविण्याचे काम ग्लोबल विकास ट्रस्टने केले आहे. जीव्हीटीला संपूर्ण हिंदुस्तानात घेऊन जाणार.










