• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home अग्रलेख

कटाक्ष – निष्ठेचा अंत …!

by गणेश सावंत
December 14, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


आजचे भारतीय राजकारण विचारांवर नव्हे तर व्यवहारांवर उभे आहे. पद, पैसा आणि सत्ता या त्रिसूत्रीने लोकशाहीच्या मुळावर घाव घातला आहे. पक्षांतर हे आता अपवाद राहिलेले नाही; तेच यशाचे लक्षण मानले जाते. सकाळी एका विचाराच्या व्यासपीठावर उभे असणारे नेते संध्याकाळी दुसर्‍या विचाराच्या दारात हजर असतात. निष्ठा ही कमजोरी आणि तत्वनिष्ठा ही राजकीय आत्महत्या ठरवली जात आहे. अशा काळात राजकारणात काय मिळते? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो; काय देतो? हा प्रश्न बाजूला पडतो.
याचं विदारक पार्श्वभूमीवर शिवराज पाटील चाकूरकर यांचे जाणे हे अस्वस्थ करणारे आहे. ते केवळ माजी केंद्रीय गृहमंत्री नव्हते, तर राजकारणात निष्ठा जिवंत असू शकते याचे चालते-बोलते उदाहरण होते. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांनी वैयक्तिक संपत्तीचा डोंगर उभा केला नाही. आजच्या राजकीय निकषांनुसार हे अपयश मानले जाऊ शकते; मात्र लोकशाहीच्या दृष्टीने हीच त्यांची सर्वात मोठी शिदोरी होती.


स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात गांधींच्या नावावर सत्तेत गेलेले आणि गांधींच्याच विचारांना सोयीस्करपणे विसरलेले अनेक चेहरे इतिहासात नोंदले गेले. सत्ता टिकवण्यासाठी विचारांशी तडजोड, पदासाठी आत्मसन्मानाचा सौदा आणि संधीसाधूपणाला ‘राजकीय प्रगल्भता’ म्हणण्याची परंपरा रुजली. या प्रवाहात न अडकणारा नेता म्हणून चाकूरकर वेगळे ठरतात. सत्ता गेली तरी त्यांनी वैचारिक निष्ठा सोडली नाही, हे आज दुर्मिळ ठरते.


राजकीय दबाव केवळ बाहेरून नव्हे, तर घरातूनही येतो. कुटुंबातील सदस्य वेगळ्या पक्षात गेले, तिकीटाची आश्वासने दिली गेली आणि ती फोल ठरली; तरीही चाकूरकरांनी आपले वैचारिक माहेर सोडले नाही. आजच्या काळात पदासाठी तासाभरात पक्ष, विचार, नाती आणि इतिहास बदलणारे नेते मोठ्या अभिमानाने वावरतात. अशा वातावरणात चाकूरकरांचे उभे राहणे हे राजकीय धैर्याचे उदाहरण ठरते.
अशा काळात काही माणसे उरली होती, जी तत्वांशी तडजोड करत नव्हती. दुर्दैवाने ती माणसे आता एकेक करून आपल्यातून निघून जात आहेत. शिवराज पाटील चाकूरकर हे त्यापैकीच एक होते. काल त्यांनी जगाचा निरोप घेतला. देशाचे गृहमंत्रीपद भूषवलेला हा नेता जाताना मात्र एक साधे घर आणि स्वच्छ नाव एवढेच मागे ठेवून गेला. आर्थिक गणितात ‘शून्य’ असलेला हा माणूस निष्ठेच्या आकाशाएवढा मोठा होता.


सत्ता टिकवण्यासाठी गांधींच्या विचारांना दगा देणारे अनेक माजी मुख्यमंत्री आपण पाहिले. सत्तेच्या मोहापुढे झुकून विचारांना कुर्निसात घालणारे कित्येक नेते इतिहासात नोंदले गेले. मात्र सत्तेच्या हस्तिनापूराची सेवा करताना भीष्मासारखी प्रतिज्ञा पाळणारा नेता चाकूरकरांमध्ये दिसून आला. आजच्या राजकारण्यांकडे पाहिलेल्या नंतर आजची पीढी किंवा येणारी पिढी त्यांच्याकडून काय आचार विचार घेईल हे सांगणे खरच कठीण, महाराष्ट्रच चालू पंचवार्षिक वर्ष अथवा मागचे दोन वर्ष हे राजकीय व्यभिचाराचे अतिउच्च शिखर मानले जाते या विरोधाभासाने लोकशाही अस्वस्थ होते. आज निवडणुका जनतेच्या विश्वासावर नव्हे, तर पैशाच्या ताकदीवर जिंकल्या जात आहेत. मतदार हळूहळू नागरिक न राहता ‘टार्गेट ग्रुप’ बनत आहे. मत हे मूल्य न राहता वस्तू बनण्याच्या मार्गावर आहे. आणि ज्या दिवशी मतांचा बाजार मांडला जाईल, त्या दिवशी सत्ता जनतेची न राहता भांडवलदारांची होईल, हे ओळखणे कठीण नाही.
अशा काळात चाकूरकरांचे आयुष्य राजकारणाला आरसा दाखवते. निष्ठा म्हणजे मागासलेपण नव्हे; ती लोकशाहीची मणक्याची हाडे आहेत. तत्वांशिवाय सत्ता ही रिकामी कवच ठरते. प्रश्न एवढाच नाही की निष्ठा संपते आहे का, तर प्रश्न असा आहे की निष्ठावान नेते संपल्यावर लोकशाहीचे काय होणार? आजची पिढी चाकूरकरांना ओळखली पाहिजे. कारण त्यांच्या आयुष्यातून काँग्रेस हा केवळ पक्ष नव्हे, तर एक वैचारिक प्रवाह कसा होता हे समजते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे राजकारण हे संपत्ती जमवण्याचे साधन नसून सार्वजनिक सेवेचे माध्यम कसे असू शकते, हे त्यांचे जीवन शिकवते. चाकूरकर हे नाव इतिहासात नोंदले जाईलच; पण चाकूरकर हे तत्व जपले गेले, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अन्यथा निष्ठेचा अंत हा केवळ एका नेत्यापुरता मर्यादित राहणार नाही; तो लोकशाहीच्या आत्म्यालाच गिळंकृत करेल. आणि तेव्हा उशिरा उमगेल – सत्ता मिळवली होती, पण लोकशाही हरवली होती.

कटाक्ष -गणेश सावंत

Previous Post

तिजोरीत खूप पैसा नाही, पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, कर्जमाफी करणार -फडवणीस

Next Post

मोठी बातमी – मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला लागणार निकाल!

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष -घुबडाचं व्रत धरू नका

by गणेश सावंत
February 27, 2026
कटाक्ष

कटाक्ष -घुबडाचं व्रत धरू नका

by गणेश सावंत
February 27, 2026
कटाक्ष

कटाक्ष -घुबडाचं व्रत धरू नका

by गणेश सावंत
February 27, 2026
अग्रलेख

अग्रलेख-आम्ही मढें झाकले,रोज सरणावर गेले

by गणेश सावंत
February 8, 2026
कटाक्ष

कटाक्ष – ट्रम्प हसतोय, चीन घुसतोय – आणि सरकार म्हणतं देश सुरक्षित आहे!निधड्या छातीला, महिला खासदारांची भीती

by गणेश सावंत
February 7, 2026
Next Post

मोठी बातमी - मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला लागणार निकाल!

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?