• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गणेश सावंत/-

त्रैतायुगात रावणाने मारीच या राक्षसाला ’सोन्याचं हरीण’ बनून सितेचे हरण करण्यास मदत करावयास लावली, तेव्हा रावणाने छळ, कपट करून सीतामाई प्रभूरामापासून लूटून नेली. ते त्रेतायूग होतं. आता कलयूग आहे. या कलयूगात भाजपाने ‘अच्छे दिन’ चे मुंगिरीलाल के हसीन सपने दाखवत प्रभूरामाची, माई सीता नव्हे तर थेट प्रभूरामालाच लूटले. हे पाप कुठे फेडणार एवढं बोलून चालणार नाही, या पापी लोकांच्या चेहर्‍यावरचे मुखवटे आता उतरावे लागणार. जे लोक साक्षात प्रभूरामालाच सोडत नाहीत ते सर्वसामान्य माणसांना सोडतील काय? प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि प्रचंड रक्तपात आणि लढ्यानंतर अयोध्येत प्रभूरामाचे मंदिर झाले. प्रभूरामाचं मंदिर बनण्यासाठी जो रक्तपात झाला तो प्रभूरामाच्या नावावर झाला असला तरी राज्यकर्त्यांच्या सत्ताकारणाचा तो एक सत्य परिपाठ आणि सत्तेचा रावणी हव्व्यास होता. प्रभूराम अयोध्येतल्या राममंदिरात बसले, आता प्रभूरामाचा वनवास संपला, देशभरातले, जगभरातले रामभक्त हर्षोल्हासित झाले. जिकडे तिकडे आनंदही आनंद पहायला मिळाला. मात्र त्रैतायूगात प्रभूरामाला जो त्रास झाला तो कलयूगातही भाजपेयी यांनी प्रभूरामाला त्यापेक्षा अधिक त्रास दिला असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरणार नाही. कारण प्रभूरामाच्या अयोध्येत साक्षात प्रभूरामाच्या घरात मध्यंतरी ज्या चोर्‍या झाल्या आणि चोर्‍या करणारे हे रखवालदारच निघाले, तेव्हा खरंच आम्ही
राम भक्त


आहोत की प्रभूरामाच्या नावावर पोटपूजे, सत्तालालची रावणी विचारसरणीचे पुरस्कर्ते आहोत हा प्रश्‍नच अयोध्येतील दानचोरीवर उपस्थित होतो. गेल्या कित्येक दिवसांपासून अयोध्येतल्या राममंदिरात चोरी होतेय अशी ओरड होत होती. चोरी करणार्‍याचे व्हिडीओही व्हायरल होत होते. ज्याच्या हाती या प्रभूरामाच्या मंदिराच्या चाव्या दिल्या होत्या तेच प्रभूरामासोबत दगाफटका करत होते. हजारो रुपयाची नव्हे दहा हजार रुपयांची नव्हे, लाखांची नव्हे तर कोट्यावधी रुपयांच्या दान आलेल्या सोन्या चांदीची या ठिकाणी सर्रासपणे लूट केली गेली. उत्तर प्रदेश सरकार चोटट्या राम भक्तांना आधी पाठीशी घालू पाहत होते मात्र जेव्हा प्रभूरामानेच आपल्या सत्य वर्तवणूकीचा दाखला वेगवेगळ्या पुराव्यातून दिला, तेव्हा कुठे उत्तर प्रदेश सरकारला आणि केंद्र सरकारला राम मंदिरात चोरी झाल्याचा आभास झाला अन् या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला. आठ आरोपीतांना यामध्ये अटक करण्यात आली. चौकशी सुरू आहे, राम मंदिर न्यासाचे सर्व सदस्य आणि प्रामुख्याने कोशागार सांभाळणारे एवढ्या मोठ्या लूटीबाबत, चोरीबाबत बोलायला तयार नाहीत. सरकारही या चोरीकडे दुर्लक्ष करण्याहेतू सावरासावर करण्यामध्ये मग्न आहेत. दुर्दैवं याचं वाटतं, देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या रामभक्तांनी आपल्या घामाचे रक्त ओकत आपल्या कष्टाची पैं पैं राम लल्लाच्या चरणी अर्पन केली. ते घामाचे पैसे, त्या घामाच्या देणग्या, सोने नाणे या चोट्ट्यांनी चोरले. हा लोकांचा संताप आहे. राम राज्यात सत्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं. परंतू प्रभूरामाच्या मंदिरात चोट्ट्या लोकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय, हे दुर्दैवं.
भक्तांसाठी राम आणि
रामायण किती महत्त्वाचे?
हा आम्हीच विचारलेला प्रश्‍न आमच्यासाठीच हाश्यास्पद म्हणावा, कारण राम या नावात एवढी ताकद आहे ते नाव सत्य आणि सत्यच सांगणारे नाव आहे. प्रभूराम म्हणजे आणि रामायण म्हणजे भारतीय जनतेचा प्राण आहे. राम जसा रामायणाचा प्राण आहे तसे प्रभूराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. रामायणात काय नाही- त्यागाची मूर्ती राम आहे, सहन करणारी सीतामाई आहे., लढणारी सीता आहे, सुख आहे दू:ख आहे, मित्र आहेत, दगाफटका आहे, युद्ध अहे, सरसी आहे, पिच्छेहाट आहे, अमृत आहे, विष आहे, हनुमानाच्या रुपात स्वामी भक्त आहे, म्हणून रामायण हे विचार स्वातंत्र्य आहे, रामायणात खुद्द वाल्मिकींनी प्रभूरामावर रोख ठोक टिका केलेली आहे. रामायण हे हिंदूधर्मातील विचार स्वातंत्र्याचा पाया रचणारे एक अमृत आहे. निसर्गात दिवसामागून रात्रं आणि रात्रीच्या गर्भात दुसर्‍या दिवसाचा उष:काल असतो. त्याप्रमाणे रामायणात सुख दु:खाचे प्रसंग एका मागोमाग स्वाभाविक घडत जातात. प्रभूराम किमान दोनदा मला जगायचे नाही असे संपुर्ण निराशेने सांगतात, तर सीतामाई माझा देह दु:खासाठीच निर्माण केलाय का? हे जणू ओरडून सांगतायत. तरीही रामायण हे सत्य आणि सत्य च्याच आधारावर बांधले गेलेले आहे. त्याच
सत्याला सत्तेसाठी कलंकीत
करण्याचे ध्येय धोरणच जणू सत्ताधिशांनी या आखलंय. प्रभूरामाच्या मंदिरात भोळ्या भाबड्या भक्तांनी दिलेल्या दानाची जेव्हा चोरी होते तेव्हा त्याच क्षणी त्या चोट्ट्यांना चोर म्हणण्याची हिंमत राम मंदिराच्या ट्रस्टींनी, उत्तर प्रदेशच्या सरकारने आणि केंद्र सरकारने दाखवली असती तर आम्हीही नव्हे तर अखंड भारतीय आणि हिंदू सत्याला सत्य म्हणण्याची ताकद व्यवस्थेत आहे. प्रभूरामाच्या कालखंडामध्ये त्याग विश्‍वास आणि प्रेमाला जे महत्त्व होतं त्या महत्त्वामुळेच राम राज्य सर्वगुणसंपन्न होतं. पुर्ण रामायणामध्ये रावणाचा छळ कपट पहायला मिळाला. अन् प्रभूरामांकडून सर्वसामान्य माणसाच्या आरोपावर सीतेचा त्याग करावा लागला. मग अशा प्रभूरामाच्या जन्मभूमीत चोरी, चपाटी करणे आणि त्यावर पांघरून घालणे कितपत योग्य, राम मंदिर न्यासाचे जे कोणी कोषागृह सांभाळत असतील त्यांनी अद्याप याविषयी भाष्य केलं नाही.
चोराला चोर म्हणण्याची
हिंमत सत्ताधिशात का नाही?
होय, आम्हाला आत्ता आठवलं, हे सत्ताधिश चोराला चोर का म्हणू शकत नाहीत. गेल्या 14 वर्षांच्या कालखंडामध्ये सत्ताधिश भारतीय जनता पार्टींनी ज्या ज्या लोकांना चोर लूटारू म्हटलं ते ते लोक भारतीय जनता पार्टीमध्ये डेरेदाखल झाले की राजा हरिश्‍चंद्राचे अवतार होतात. ते चारित्र्यसंपन्न होतात. ज्यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनी भाजपासोबत जुळवून घेतलं की ते भ्रष्टाचारी, चोरटे नव्हे दानवान, दयावान झालेले असतात. मग हे सत्ताधीश त्या चोरांना चोरटे म्हणू शकत नाहीत, ते प्रभू रामाच्या लुटारूंना चोट्टे कसे म्हणतील.
तो मारीच राक्षस मग हे कोण?
प्रभू राम सितामाईसोबत लक्ष्मणाला घेऊन चौदा वर्षाच्या वनवासाला निघाले, त्यांना त्रास देणार्‍या शुर्फ नखाचे नाग लक्ष्मणाने कापले आणि तिथेच राम आणि रावणाच्या युद्धाची ठिणगी पडली. रावणाने लगेच सोन्याचा रथ मागवला, त्यात आरुढ होऊन मारीचा कडेला गेला. रावणाने मारीचाला आपला बेत सांगितला. मारीचाने रावणाला आधी नकार दिला. तू सितेचे हरण केले, तर तुझा नायनाट होईल, शेवटी रावणाच्या हट्टापुढे मारीचा नमला. त्याने वनात येऊन सोनेरी हरणाचे रूप घेतले. सितामाई त्या हरणाला बहाळून गेल्या. प्रभूराम हरणाची शिकार करण्यासाठी धावले,  इकडे सितामाईचे अपहरण रावणाने केले. पुढे काय झाले, हे जगजाहीर आहे. मग 2014 साली ज्यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले, मेकिंग इंडियापासून ते जगज्जेते भारतापर्यंत नव्हे नव्हे तर विश्वगुरूपर्यंत तुम्ही-आम्ही स्वप्न पाहिले. सरशेवटी 2026 ला प्रभू रामाच्याच मंदिरात व्यवस्थेच्या बगलबच्च्यांनी रामाला लुटले. तेव्हा रावण आणि मारीचा सितेच्या हरण करण्यासाठी होते मग आता रामाचे पैसे, सोने-नाणे लुटणारे कोण? 

Previous Post

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

Next Post

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अग्रलेख

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

by गणेश सावंत
June 28, 2026
Next Post

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?