पुणे (रिपोर्टर) बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची केस मागे घेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने सरनाईक आणि राज्याची माङ्गी मागावी, भाजपने देशासमोर राज्याची प्रतिमा खराब केल्याचा आरोपही यावेळी सुप्रिया यांनी केला, पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, भाजपने ब्लॅकमेल केल्यामुळेच सरनाईक शिंदेंसोबत गेले. आज तुम्ही म्हणता की, आमच्याकडे काही पुरावेच नाही, मग तुम्ही पहिल्यांदा त्यांच्यावर आरोप केले ते खोटे होते का? याची कबूली दिली पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सरनाईक कुटुंबियांची हात जोडून माङ्गी मागावी. जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असतील तर त्यांनी देशासमोर महाराष्ट्राची माङ्गी मागावी, अशी मागणी सुळे यांनी केली. पुढे सुळे म्हणाल्या की, ज्यांच्यावर खोटे आरोप झाले, नंतर ते सरकारमध्ये गेलेत त्यानंतर त्यांना क्लिनचीट मिळाली, त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप झाले की, ब्लॅकमेल करण्यात आले, याला राजकारण म्हणत नाही, असा टोलाही यावेळी सुळेंनी भाजपवर लगावला. शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यानंतर आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा आहे. तपासात प्रगती होत नसल्याने क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. टॉप्स सिक्युरीटीज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे पोलिसांनी म्हटले. याच रिपोर्टच्या आधारावर अटकेत असलेल्या आरोपींनी ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टात अर्ज केला आहे. अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक शशिधरन यांनी कोठडीला विरोध करत आता दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे.