• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

प्रखर- सावज टिपणारी टोळधाड

by Beed Reporter
December 6, 2022
Reading Time: 3 mins read
0
प्रखर- सावज टिपणारी टोळधाड
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp
सध्याचा जमाना प्रगतीचा आहे. या प्रगतीच्या युगात अनेक शोध लागले. माणसाचं जीवन सुखर करणार्‍या अनेक वस्तू बाजारात आणल्या आहेत. आजचं आणि कालचं जग खुप वेगळं आहे. इंटरनेटमुळे संपर्काचं जाळं जगभरात पसरलं. माणुस कोठे ही बसून बोलू शकतं. व्हीडीओ कॉल करु शकतो. एका टोकावरुन दुसर्‍या टोकापर्यंत संपर्क होवू शकतं. जगणं इतकं सोपं झालं. माणसांनी ज्या वस्तू बनवल्या त्या तितक्यात चांगल्या आहेत व वाईट ही तितक्यात आहेत. त्याचा वापर कसा करायचा हे माणसावर अवलंबून आहे. पुर्वी तलवार संरक्षणासाठी होती, त्याचा गैरवापर केला तर त्यामुळे माणसं मारता येत होती. आज ढाल, तलवारीची गरज नाही. आज बुध्दीची गरज आहे. बुध्दीवरच माणुस मोठा होवू शकतो. बुध्दीचा योग्य वापर केला नाही तर छोटा ही होवू शकतो. बुध्दीचा वापर कसा करायचा हे ठरवता आलं पाहिजे. इंटरनेट संपर्कसाठी चांगलं असलं तरी त्याचा आज गैरवापरच जास्त होवू लागला. व्हॉटसॉफ, फेसबुक, ट्टिटर, इस्टाग्राम इत्यादी संपर्काचे माध्यमं जगभरात विस्तारले. तीस वर्षापुर्वी आजच्या माध्याबाबत कुणी भाष्य केलं असतं तर त्याला नक्कीच त्या वेळच्या लोकांनी वेडयात काढलं असतं. येत्या काळात माध्यम क्षेत्रात आणखी खुप बदल होवू शकतात, ते बदल नेमके काय असू शकतात हे आज तरी नक्की सांगता येत नाही.
नव्वदचा काळ
1990 च्या काळात देशात आणि जगात बदल झाला. हा काळ प्रगतीचा काळ मानला जातो. या काळात तंत्रज्ञानाचा विस्तार झाला. जग एकमेकांशी जोडलं गेलं. नव्या तंत्रज्ञानाला त्यावेळच्या अनेकांनी विरोध सुध्दा केला होता. त्याच्या विरोधात संप, आंदोलन झाले होते. भारतात राजीव गांधी यांनी कॉम्प्युटची सुरुवात केली. नवं तंत्रज्ञान आल्याने त्याचा रोजगारावर परिणाम होईल असं सांगितलं जात होतं. बेरोजगारीत भर पडेल अशी भीती व्यक्त केली जात होती. आज नव्या तंत्रज्ञानावरच सर्व काही उभं आहे. नवं तंत्रज्ञान नसतं. तर तितका बदल दिसून आला नसता. ऐंशी, नव्वदच्या दशकात एखाद्याच्या घरात फोन असणं हे प्रचंड श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं मानलं जात असे. आज एखाद्याच्या जवळ फोन नसणं हे दारिद्रयाचं आणि बेकारीचं लक्षण मानलं जातं. घरात काही असो कि नसो. फोन असावा असाच प्रत्येक नागरीकांचा विचार असतो. नवीन पिढी फोन शिवाय राहू शकत नाही इतका फोन गरजेचा झाला. साधा फोन वापरण्यापेक्षा स्मार्ट फोन वापरण्याकडे लोकांना कल वाढला. बाजारात नवीन फोन आला की त्याच्या खरेदीसाठी जास्त ओढ असते. काही नामंकीत कंपन्यांचा फोन घेण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. इतकी फोनची विक्री होऊ लागली. 2017 साली व्हॉटसअ‍ॅप वापरणारे 20 कोटी होते. 2019 मध्ये त्याची संख्या 40 कोटी पर्यंत गेली होती. 2022 पर्यंत त्यात आणखी भर पडून ती जवळपास पन्नास कोटी पेक्षा जास्त गेली आहे. येत्या पाच वर्षात ऐंशी टक्के लोकाकडे स्मार्ट फोन दिसतील.
ऑनलाईन फसवणुक
सोशलमीडीयाचा आधार घेवून लोकांना फसवण्याचे जोरदार फंडे राबवले जावू लागले. कुणाला तरी वेगळा मॅसेज करायचा, त्यातून समोरचा व्यक्ती कुठलाही विचार न करता. त्या मॅसेजला भुलतो, आणि आपली फसवून करुन घेतो. फसवणूक झाल्यानंतर त्याला जाग येते. फसवणूक ही सर्वसामान्यांची होते,असं नाही. शिकलेल्या व्यक्ती देखील फसतात. आधार नंबर घेणे, बँक खाते नंबर घेणे, एटीएमचा पासवर्ड घेणे असे प्रकार गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले. समोरच्या व्यक्तीला आपल्या आर्थिक बाबीची गुप्त माहिती दिल्यानंतर ती व्यक्ती बँकेतून ऑनलाईन पैसे काढून घेते. काहींना अशा प्रकरणातून लाखो रुपयाला गंडा लागलेला आहे. लोकांना फसवणं हा जणू काहींचा धंदाच होवून बसला. रस्त्याने जात असतांना काही भामटे लोकांना कुठले ना कुठले बहाणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळतात. किंवा त्यांना आमिष दाखवून सोने लुटतात, तसाच प्रकार ऑनलाईच्या बाबतीत झाला आहे. एकदा फसवणूक झाल्यानंतर तक्रार करुन काही फायदा नसतो. तक्रार केल्यानंतर आपले पैसे परत येतील याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे लोक शक्यतो तक्रार दाखल करायला पुढे नाही. गुन्हे दाखल झाल्यानंतर अज्ञात आरोपींना तात्काळ जेरबंद केले जात नाही, हे आरोपी सापडत नाहीत. परराज्यात बसून हे लोक ऑनलाईन लोकांची फसवणुक करत असतात. साध्या गुन्हेसाठी पोलिस परराज्यात जाण्यास तयार नसतात. त्यामुळे आरोपींचं फावतं. आपण दिवसभर कित्येकांची फसवणुक केली तरी आपल्यावर काहीच कारवाई होत नाही असा भामटयांचा समज झालेला आहे. त्यामुळे भामटे बिनधास्त लोकांना लुटण्याचे काम करुन स्वत: गडगंज होत असतात.
चुकीचा वापर
सोशल मीडीया माहिती पुरवण्यासाठी चांगलं माध्यम आहे. स्वत:च मत व्यक्त करण्यासाठी त्याचा चांगला वापर केला जाऊ शकतो, पण त्याचा चांगला वापर केला जात नाही हीच मोठी दुर्भाग्याची बाब आहे. सोशल मीडीयावर कोण काय पोस्ट टाकेल याची गॅरंटी राहिली नाही. लोकांच्या भावना भडकावण्याचं काम सोशल मीडीयातून जास्त होतांना दिसून येत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये देशात ज्या ठिकाणी दंगली सारखी परस्थिती निर्माण झाली होती. त्याला बराच सोशल मीडीया जबाबदार राहिलेला आहे. कुठे काही घटना घडली की, आधी सोशल मीडीया बंद केला जात असतो. चांगलं करण्यापेक्षा लोक वाईट करण्यावरच जास्त भर देत असतात. त्यामुळे समाजाचा पोत खराब होवू लागला. कुठलीही बाब कशी हाताळली पाहिजे याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आज तरुण मंडळी नको त्या उचापती सोशल मीडीयाच्या माध्यमातून करु लागले. एखाद्याला बदनाम करण्यासाठी सोशल मीडीयाचा जोरदार वापर होवू लागला. राजकारणी मंडळीने सोशल मीडियाचा आपल्या राजकारणासाठी वापर सुरु केलेला आहे. निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडीया पुढे दिसून येत आहे. राजकारणी मंडळी पेड कार्यकर्त्यांची सोशल मीडीयासाठी नियुक्ती करतात, आणि विरोधकांच्या विरोधात चुकीच्या पोस्ट टाकायला लावत असतात. काही मुलं मुलींना बदनाम करण्यासाठी सोशल मीडीयाचा वापर करतात. सोशल मीडीयामुळे क्राईमच्या घटना वाढू लागल्या. फ्रेडशीप असेल किंवा अन्य कुठल्या ना कुठल्या कारणावरुन महिलांना टार्गेट केलं जावू लागलं. सोशल मीडीयामुळे कुटूंबात कलह निर्माण होवू लागले. पत्नी, पत्नीत भांडणाचे कारण सोशल मीडीया ठरू लागला. काही मंडळी, धार्मिक बाबतीत चुकीची माहिती सोशल मीडीयात टाकून लोकांना संभ्रमीत करत असतात. गाव पातळीवरचे लहान, लहान मुलं सोशल मीडीयाच्या आहारी गेले आहेत. काहींना दिवसभर काम नसेल तर ते व्हॉटसॉफ आणि फेसबुकवर कायम ऑनलाईन असतात. कुणी काय पोस्ट टाकली. त्याला कुणी, कुणी लाईक केलं याकडेच लक्ष असतं. काम धंदा सोडून मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणारे देशात कमी नाहीत. नेट डाटा स्वस्त झाल्यामुळे नेट वापरणारांची संख्या वाढली. कुठलाही थांबा बघितला तर त्या ठिकाणी मोबाईलमध्ये डोकं घालून बसणारेच लोक दिसून येतात. अति मोबाईचा वापर घातक असतांना त्याचा कुणी विचार करतांना दिसत नाही.
ब्लॅकमेलींगचे प्रकार वाढले
सोशलमीडीया हा आगीसारखा झाला. आग लागू नये याची दक्षता घेतली तर नक्कीच सोशल मीडीया चांगला आहे, पण काही गोेष्टी घडून गेल्यानंतर लोकांना जाग येते, आनलाईन चाटींगचे प्रकार वाढले. समोरचा व्यक्ती कोण आहे हे चॅटींग करतांना कळत नाही. एखादा तरुण तरुणींच्या नावने चॅटींग करतो, त्याला काही जण भुलतात. त्याचाच फायदा समोरचा व्यक्ती उचलतात आणि नंतर चॅट केलेल्या शब्दांचा आधार घेवून ब्लॅकमेलींग करण्याचा प्रकार सुरु होतो. आपली बदनामी होवू नये म्हणुन काही जण समोरच्या व्यक्तीला पैसे सुध्दा पाठवतात. दुसरा गंभीर प्रकार म्हणेज ऑनलाईन सेक्स्टॉर्शन हे प्रकार वाढले. व्हॉटसॉफ,फेसबुकला कॉल येतात. या कॉलद्वारे मैत्री वाढवली जाते. त्यातून समोरचा व्यक्ती संबंधीताची मानसीकता पाहून ते त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. समोरचा व्यक्ती चांगला प्रतिसाद देत असल्याचे पाहिजे. ब्लॅकमेलींग करणारा मग आपला खरा रंग दाखवतो. अगदी नको ते कृत्य करण्या पर्यंत लोकांची मजल जाते ते ही कॅमेर्‍यासमोर. यातच लोकांची फसगत होते. जेव्हा आपण नको ते करुन बसतोत. तेव्हा कॅमेर्‍याच्या नजरेत असतोत हे लोकांना माहित नसतं. त्याचाच आधार घेवून ब्लॅकमेलींग सुरु होते. ब्लॅकमेलींग करणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांना मॅसेज, व्हीडीओ पाठवत असते. त्यात आपली बदनामी होवू नये म्हणुन जितके मागतील तितके पैसे दिले जाते. असे काही प्रकरणं पोलिसांसमोर येतात. काहीं बदनामीच्या भीतीपोटी पोलिसाकडे येत नाहीत. देशात अशा प्रकारामुळे काहींनी आत्महत्या सुध्दा केलेल्या आहेत. काही दिवसापुर्वीच पुण्यात दोन तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ब्लॅकमेलर करणारी टोळी दिवसभर सावज टिपण्याचं काम करत असते. ब्लॅकमेलरच्या वेगवेगळ्या टोळ्या असतात. एक पकडली तर दुसरी तयारच असते. त्यांना लोकांना कसं फसवायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं, हे लोक उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, दिल्लीत बसून हे सगळं करत असतात. सोशल मीडीयावर होत असलेला गैरप्रकार हा एक डोक्याला मोठा हॅडॅक आहे. सोशल मीडीयाचा वापर जपून करणं ही प्रत्येकांची जबाबदारी आहे. आपली फसगत,बदनामी टाळण्यासाठी प्रत्येकाने जागृक राहणं गरजेचं आहे.
Previous Post

माघार कसली घेता? पवारांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या

Next Post

कर्नाटक सीमाप्रश्न पेटला, महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
कर्नाटक सीमाप्रश्न पेटला, महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक

कर्नाटक सीमाप्रश्न पेटला, महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?