गंगावाडीच्या गावकर्यांनी टेंडर रद्दचा घेतला ठराव
गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील गंगावाडी गोदावरी नदीच्या वाळूची किंमत बाजारात मनमनी हजारो रुपये प्रतिब्रास झाली असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे मनोबल वाढले आहे. या संदर्भात गांवकरी यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने बीड जिल्हाधिकारी यांनी निवेदन होते त्याच अनुषंगाने दिंनाक 2/5/22 रोजी उपोषण चालु असुन या उपोषणास पाठींबा देण्यासाठी आ. लक्ष्मण आण्णा पवार उपस्थित राहिले उपोषणास अन् पाठिंबा यावेळी संबोधित करतात आ. पवार म्हणाले की, तुम्ही तुमच्या मागण्यावर ठाम रहा मी सदैव तुमच्या पाठीशी राहिल तुमच्या केसाला ही धक्का लागणार नाही हे गंगावाडील वाळू टेंडर रद्द होत नाही तो पर्यंत मी तुमच्या सोबत राहिल तुम्ही घाबरू नका न्याय मिळे पर्यंत मागे हाटायचे नाही असे सांगून उपोषण कर्त्यास बळ दिले.
तालुक्यातील गंगावाडी, तपेनिमगांव या गाव परिसरात गोदावरीचे पात्र आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची दररोज वाहतूक केली जाते. विशेषत: गोदावरी नदीपात्र पाण्याने भरलेले असतांना देखील पाण्यात केणी यंत्राचा वापर करून वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाळू तस्करांचे अड्डे निर्माण झाली आहे. त्यातच प्रशासनाकडून अपेक्षित वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारात वाळूला मोठी मागणी आहे. ही मागणी भरून काढण्यासाठी व प्रतिब्रास हजारो रुपयांप्रमाणे वाळू विकून अपाम पैसे मिळवण्याची संधी चालून आली असल्याने वाळू माफियांकडून दररोज केणी जेसीबी व इतर साधनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. अनेक वेळा गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर कारवाईचे सोंग करण्यात येते. त्यानंतर मिलीभगत करून वलीपार्टी करत आहेत मात्र, कारवाईनंतर पुन्हा जोशाने वाळू उपसा केला जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा महसुल व पेलिस प्रशासनाने प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.यावेळी उपोषणास कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड सुरेश हात्ते, पंचायत समिती सदस्य पती प्रा. शाम आबा कुंड, शेतकरी चळवळीत सामाजिक कार्यकर्ते शेतकरी पुत्र -बंडूभाऊ यादव, ग्रामपंचायत सदस्य -दुरेश चिकणे, नामदेव दादा कांबीलकर, हनुमंत चिकणे, माजी सरपंच श्रीराम जाधव, भोगलगांवचे रामेश्वर मस्के, भाऊसाहेब यादव, देविदास फलके, कृष्णा मोरे, अॅड. सुरेश पवार, विठ्ठल हात्ते, दत्ता हात्तेसह अनेक जण उपस्थित होते.
अनेक जिल्ह्यात केली जाते वाहतूक
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून रात्री-अपरात्री वाळू उपसा केला जातो. या वाळूची औरंगाबाद, जालना, परभणी, अहमदनगर यासह बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोहोच केली जाते. त्यामुळे यातून वाळू माफियांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे शासनाचा कर बुडवून गोदावरी पात्राचे वाळवंट केले जात आहे.