Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमसिंदफणा नदीत आढळला मृतदेह

सिंदफणा नदीत आढळला मृतदेह

बीड (रिपोर्टर)- सिंदफणा नदी पात्रातील एका झाडावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चकलांबा पोलिस दाखल झाले आहेत.
शिरूर तालुक्यातील हाजीपूर परिसरामध्ये सिंदफणा नदी पात्रातील झाडाला लटकलेला एक मृतदेह आढळून आला या प्रकरणी चकलांबा पोलिसांनी तपास केल्यानंतर शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मिसिंग दाखल होती. तो मृतदेह त्याच व्यक्तीचा असल्याचे पोलिसांना खात्री पटली आहे. अतिवृष्टीमध्ये पुरात एक इसम वाहून गेला होता, त्याचाच तो मृतदेह असल्याचे पोलिसांना खात्री पटली. मिसिंग असलेल्या इसमाचे नाव मोहन विठ्ठल अवंतकर (वय ८५ वर्षे, रा. नांदवकी ता. शिरूर) असे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिगांबर हे करीत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!