बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीमुळे रस्ता होण्यास होणारा अडथळा अखेर आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जावून नागरीक व प्रशासन यांच्यात मध्यस्थी केल्यानंतर रुग्णालयाच्या पाठीमागील दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवनकडे जाणार्या डीपी रोडचे काम सुरू होणार आहे. तर दुसरीकडे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 200 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले होते. त्या कामाची पाहणी आज आ. क्षीरसागरांनी केली.
जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवनकडे जाणार्या डीपी रस्त्याचे काम नगरोत्थान योजनेतून चालू होते. (पान 7 वर)
मात्र जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीमुळे सदरच्या रस्त्यास अडथळा निर्माण होत होता. आज आ. संदीप क्षीरसागर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. प्रशासन व नागरिकांमध्ये मध्यस्थी करून संबंधित भिंतीचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू होऊन लवकर पुर्ण होणार आहे. या पाठोपाठ आ. क्षीरसागरांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते 200 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले होते. त्याचे बांधकाम पुर्णत्वाकडे जात असून त्या कामाची पाहणी त्यांनी केली. सदरचे काम हे 58.21 कोटी रुपयांचे आहे. या इमारतीमुळे जिल्हा रुग्णालयाच्या 200 खाटा वाढणार आहेत.