Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनारुग्णांच्या नातेवाईकांची रेमडिसीवीरसाठी धावपळ खासगी रुग्णालयासाठी केवळ ४८ रेमडिसीवीर

रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडिसीवीरसाठी धावपळ खासगी रुग्णालयासाठी केवळ ४८ रेमडिसीवीर

वाटपाचे सर्व अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना
बीड (रिपोर्टर):- रेमडिसीवीरचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर गेल्या ४८ तासापासून बीड जिल्ह्यात रेमडिसीवीरचा प्रचंड तुटवडा जाणवत असून इंजेक्शनसाठी कोरोना बाधीत आणि न्युमोनिया बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू असून खासगी रुग्णालयांसाठी आज केवळ ४८ रेमडिसीवीर आल्याची माहिती औषध प्रशासनाचे डोईफोडे यांनी दिली. दुपारपर्यंत हे इंजेक्शन जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाधीन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. इंजेक्शन वाटपाचे सर्व अधिकार सध्या शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयातही रेमडिसीवीरचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येते.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामध्ये बाधित झालेल्या रुग्णांमध्ये गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. न्युमोनिया बाधित असणार्‍या रुग्णांना रेमडिसीवीरची गरज असते. गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात रेमडिसीवीरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे नातेवाईक सदरचे इंजेक्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणी धावाधाव करत असून जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु इंजेक्शन नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सकही त्यांच्या भेटी टाळत आहेत. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी अनेक जण ताटकळत उभे आहेत. याबाबत रिपोर्टरने अन्न व औषध प्रशासनाचे डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी आज ४८ इंजेक्शन आल्याचे सांगून दुपारपर्यंत ते शल्यचिकित्सकांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे म्हटले. इंजेक्शन वाटपाचा अधिकार शल्यचिकित्सकांना देण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात रेमडिसीवीरचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी रेमडिसीवीरचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर परिस्थिती सुधरेल, असे वाटत असतानाच रेमडिसीवीरबाबत परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!