Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनासामजिक जबाबदारी अन् कर्तव्य म्हणून कोविड सेंटर सुरु -अमरसिंह पंडित

सामजिक जबाबदारी अन् कर्तव्य म्हणून कोविड सेंटर सुरु -अमरसिंह पंडित

गेवराई (रिपोर्टर)-सामजिक भान, जबाबदारी आणि कर्तव्य समजून मी हे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला असून प्रशासन आणि आरोग्य विभागाला आपण मिळून सहकार्य करु. आपल्या निष्काळजीपणा मुळे स्कोअर वाढत असून हि चिंतेची बाब आहे, त्यासाठी गावागावात जाऊन लक्षणे दिसणा-यांनी तातडीने चाचणी करुन घेण्याचे आवाहन करत गेवराई तालुक्यात रुग्ण वाढू नये अशी आपेक्षा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली. गेवराई येथील जयभवानी शिक्षण संकुलात शारदा हॉंस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट च्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते.

कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या पार्श्‍वभुमीवर गेवराई तालुक्यातील जयभवानी शिक्षणसंकुलात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सुरु केले असून पहिल्या टप्प्यात आज १०० खाटांची तयारी करुन त्याचे लोकार्पण आज शनिवार दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. संपन्न झाले. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, नायब तहसिलदार डॉ. जाधवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, तालुका आरोग्य गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करत हा समारंभ झाला.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम म्हणाले की, अडचणीच्या काळात प्रशासनाला कायम सहकार्य करण्याची भुमिका अमरसिंह पंडित साहेबांनी घेतली असून त्यांनी अतिशय सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभा करुन मोठे काम केले आहे. यामुळे आरोग्य विभागाला आता आधिक चांगले काम करुन रुग्णांना आता तात्काळ सुविधा मिळणार आहेत. आपणही सुरक्षितता पाळली पाहिजे असेही ते म्हणाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे म्हणाले की, प्रशासनाला या केअर सेटरची खुप मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. चिंचोले म्हणाले की, गेवराई तालुक्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी खुप मोठे पाऊल उचलले असून सुसज्ज केअर सेंटर उभा करुन आपले कर्तव्य पार पाडले आहे तर नायब तहसिलदार डॉ. जाधवर म्हणाले की, गेवराई तालुक्याला दोन कोविड केअर सेंटर होते. रुग्णांची वाढणारी संख्या पाहुन अमरसिंह पंडित यांनी चांगल्या कोविड केअर सेटर उभे करुन ज्यांच्या नावातच सिंह आहे तसाचा त्यांनी सामाजिक कामातही सिंहाचा वाटा उचलला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, आरोग्य विभागाचे डॉ. भारत नागरे, डॉ. लगड, डॉ. वैभव, डॉ. शरद पवार, डॉ. आश्विनी देशमुख , आनिता निर्मळ, शितल निसर्गध यांच्या पारिचारीका उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!