मुंडेंच्या हस्ते 15 कोटी 40 लाखांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ रेवली, वाका, गाढेपिंपळगाव आणि कौडगाव घोडा या चार गावांना होणार लाभ
परळी (रिपोर्टर) परळी मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचा मी आमदार आहे. इथल्या जनतेने जे प्रेम व आशीर्वाद मला दिले, विकासाच्या माध्यमातून त्यातून उतराई होणार आहे. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा योजनेची कामे आपण हाती घेत आहोत, या माध्यमातून मी पुण्य कमवतोय, असे मत आ. धनंजय मुंडे यांनी रेवली (ता. परळी वैद्यनाथ) येथे बोलताना व्यक्त केले आहे.माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत परळी तालुक्यातील 4 गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या सुमारे 15 कोटी 40 रुपये किमतीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि. 01) सायंकाळी रेवली येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
आ. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन योजनेतील कामांचा डीपीआर मंजूर केला होता. त्यामुळेच जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेची कामे हाती घेण्यात येत आहेत. शनिवारी शुभारंभ करण्यात आलेल्या परळी तालुक्यातील खालील कामांचा यामध्ये समावेश आहे : जलजीवन मिशन अंतर्गत 15 कोटी 40 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ 1. पोहनेर येथील बंधार्यावरून पाईपलाईन द्वारे रेवली येथे पाणी आणणे (18800 मीटर) 2. रेवली येथे 4 गावांसाठी 1.5 चङढ फिल्टर प्लांट बसवणे 3. पाण्याच्या टाक्या बांधकाम 1. रेवली – 1,17,000 लीटर 2. गाढे पिंपळगाव – 55,000 लीटर 3. वाका – 1,20,000 लीटर 4. कौडगाव (घोडा) – 55,000 लीटर 4. रेवली फिल्टर प्लांट पासून पाईपलाईन द्वारे चार गावांना पाणी आणणे 1. रेवली – 6670 मीटर 2. कौडगाव (घोडा) – 10,580 मीटर 3. गाढे पिंपळगाव – 8250 मीटर 4. वाका – 3890 मीटर
5. गावांतर्गत पाईपलाईन 1. रेवली – 3175 मीटर 2. गाढे पिंपळगाव – 1735 मीटर 3. वाका – 1735 मीटर 6. त्याचबरोबर रेवली फिल्टर प्लांट पासून चारही गावांसाठी मोटर व सोलर सिस्टीम बसवणे अशा एकूण 15 कोटी 40 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील कामांचा भूमीपूजन सोहळा आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारला धारेवर धरून अधिवेशनात आवाज उठवला, आनंदाचा शिधा आलाच नाही, यावरूनही सरकारला सवाल केला, आगामी काळात सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांवर लढत राहु, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी बोलताना म्हणाले. यावेळी शिवाजीराव सिरसाट, सूर्यभान नाना मुंडे, पिंटू मुंडे, विष्णूपंत देशमुख, प्रभाकरराव पौळ, माऊली तात्या गडदे, राजाभाऊ पौळ, वसंतराव तिडके, शरदराव राडकर पाटील, राजाभाऊ गिराम, मनोहर केदार, विठ्ठलराव गित्ते, माधवराव नायबळ, रामराव अण्णा केंद्रे, गोविंद कराड, दिलीप दादा कराड, मुंडे गुरुजी, पांडुरंग गंगणे, किसनराव कांदे, ज्योतिनाथ कांदे, हनुमंतराव बनसोडे, उत्तमराव राठोड, नामदेवराव राठोड, शेख शमशुद्दिन, शेख रईस, शेख सादेक, गजेंद्र कोळेकर, ज्ञानोबा कोपनर, बंकटराव नाईकनवरे यांसह आदी उपस्थित होते.