Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाअजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांवर सौम्य लाठीमार

अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांवर सौम्य लाठीमार


बीड (रिपोर्टर):- कोरोना काळामध्ये जिल्हा रूग्णालयात काम करणार्‍या कोव्हिड योद्धांना कायमस्वरूपी कामावर घ्या या मागणीसाठी आज शेकडो आरोग्य कंत्राटी कर्मचार्‍यांनी आज उपमुखमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा बीड पोलीसांनी या कर्मचार्‍यांवर सौम्य लाठीमार केला. या गोंधळात काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व कर्मचार्‍यांची मागणी शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहचली.


कोव्हिड काळामध्ये आरोग्य सेवा देणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घ्या या मागणीसाठी आज शेकडो कंत्राटी आरोग्य कर्मचारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. यावेळी शेकडो महिलांसह अन्य कर्मचार्‍यांचा समावेश होता. या कर्मचार्‍यांच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळास अजित पवार यांची भेट घेण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार त्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांची भेट घेवून निवेदनही दिले. मात्र बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटू द्या असा हट्ट कंत्राटी कर्मचार्‍यांनी घेतला आणि अजित पवार यांचा ताफा अडवण्यासाठी यातील काही महिला कर्मचारी यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. जेंव्हा उपमुख्यमंत्री बैठक संपवुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघाले तेंव्हा काही कर्मचार्‍यांनी भेटीचा हट्ट धरत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या कर्मचार्‍यांना हुसकावण्यासाठी बीड पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये तणाावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आ.संदिप क्षीरसागर यांनी घटनास्थळी येवून उपस्थित आंदोलकांशी चर्चा करत त्यांच्या मागणी शांतपणे ऐकून घेत आपले म्हणणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहचत करतो असे आश्‍वासन दिल्यानंतर आदोलक शांत झाले.

Most Popular

error: Content is protected !!