रुग्णालयाची परिस्थिती पाहून साबळेंनी अधिकार्यांना खडसावले
बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयाचा कारभार डॉ. सुरेश साबळे यांनी सुधारला असून जिल्हा रुग्णालयअंतर्गत असणार्या इतर रुग्णालयांचा कारभारही स्वच्छ करण्याचा प्रयत्न साबळे करू लागले. काल त्यांनी पाटादेा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता त्या ठिकाणी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकार्याला चांगलेच धारेवर धरून त्यांना नोटीस बजावली आहे.
जिल्हा रुग्णालयाचा कारभार सध्या चांगला सुरू आहे. यामध्ये डॉ. सुरेश साबळे यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. साबळे हे रुग्णालयाच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन असतात. जिल्हा रुग्णालयाअंतर्गत असणार्या इतर रुग्णालयांचा कारभार सुधारण्याचा प्रयत्नही त्यांनी सुरू केला आहे. काल त्यांनी पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. तेथील रुग्णांना चर्चा करत तेथील व्यवस्थेबाबत नापसंती व्यक्त करत गैरकारभार करणार्या वैद्यकीय अधिकार्यांना त्यांनी चांगलेच फैलावर गेत निष्काळजीपणा करणार्या अधिकार्यांना त्यांनी नोटीस बजावली. या वेळी त्यांच्या समवेत डॉ. राम आव्हाड यांची उपस्थिती होती.