बीड (रिपोर्टर) शासनाच्या शेतकरी आणि लोकांसाठी अनेक योजना आहेत मात्र या योजना लोकांपर्यंत पोहचत नाहीत. त्याचा फायदा गरजुंना होत नाही म्हणून बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शासकीय योजना ग्रामीण भागाती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्याचा फायदा कसा घ्यावा याच्या जाणीवजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच जत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ मुंडे यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन ापआपल्या विभागाच्या योजना, त्याची माहिती पत्रक, त्याचे डिजिटल बॅनर आणि योजना जिल्ह्यातील जनतेपर्यंत कशा पोहचतील याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी आपल्या कार्यालयात बैठक घेतली. यामध्ये प्रामुख्याने महिला आणि बालकांसंदर्भातील योजना, शेतकर्यांना अनुदान स्वरुपात शेती औजारे, पाईपलाईन, सामाजिक न्याय विभागाच्या अनुचीत जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या योजना याबाबत सर्व विभागांनी अद्यावत नियोजन करून जिल्हा पातळीपासून गावपातळीपर्यंत या योजना पोहचविण्यासाठी योजना जत्रा महोत्सव आयोजीत करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले. या सर्वांचे तात्काळ नियोजन करून अंमलबजावणी करण्याची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.