मागील मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची पाठपुरावा करून आमदार संदीप क्षीरसागर नुकताच अनुदान मंजूर करून घेतले होते त्यातच काल दुपारी झालेल्या गारपीटीमध्ये बीड आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जीवित हानी वित्तहानी पशुहानी झाली असून नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सकाळीच थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहाणी केली आणि वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांच्या परिवारास दिली भेट तसेच इजा झालेल्या शेतकर्याची केली दवाखान्यात जाऊन चौकशी.काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नुकसान झालेल्या बळीराजाला तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याच्या सुचना प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.
तिप्पटवाडी येथे वीज पडल्याने अनंता शेंडगे यांच्या दोन पशुधनाचा मृत्यू झाला तर राजेश सस्ते यांच्या फळ बागाचे अतिशय नुकसान झाले आहे. आज सकाळी ग्रामस्थांसह त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मांजरसुंबा अंतर्गत चोरमले वस्तीवर वीज पडल्याने श्रीराम बाळू चोरमले व तुळशीराम बाळू चोरमले या जखमी शेतकरी बांधवांची दवाखान्यात बीडचे तहसीलदार यांच्या सोबत जाऊन भेट घेतली. बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर (का.) तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये नैसर्गिक वातावरण बदल झाल्याने काल दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपीट झालेली आहे. सदरील झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील उभ्या पिकांची, फळबागेचे, भाजीपाल्याचे सर्व रित्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच वीज पडल्याने बीड तालुक्यातील फुकेवाडी, ढेकणमोहा, घोसापुरी, वंजारवाडी, तिप्पटवाडी व मांजरसुंबा अंतर्गत चोरमले वस्ती व दोन्ही तालुक्यातील इतर गावात पशुधनहानी व मनुष्य इजा देखिल झालेली आहे. ग्रामीण भागातील काही घरांची पडझड झालेली आहे. तरी, अवकाळी पाऊस, गारपीट, वीज पडणे अशा झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे होणे बाबत विभागाला आदेशीत केले व यापुर्वी झालेल्या नुकसानीचे, काल झालेल्या नुकसानीचे शेतकरी बांधवांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाची पत्र व्यवहार केला असून प्रशासकीय पातळीवर माझ्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. असे आश्वासन सांत्वन करताना आ.संदीप क्षीरसागर यांनी शेतकर्यांना दिले