बीड (रिपोर्टर) देशभरातून दरवर्षी हजारो मुस्लिम भाविक हज यात्रेला जात असतात. यावर्षीही बीडसह मराठवाड्यातील शेकडो भाविक हजला जात असून या भाविकांनीआतापर्यंत दोन हप्ते कमिटीकडे जमा केले. तिसरा हप्ता देणे बाकी आहे मात्र बीडसह मराठवाड्यातील भाविकांकडून ऐंशी हजारापेक्षा जास्तीची रक्कम आगाऊ घेतली जाऊ लागल्याने भाविकात नाराजी व्यक्त होत आहे. ही आगाऊ रक्कम नेमकी कशाची? असा प्रश्न उपस्थित होत असून पैसे कमी करण्याची मागणी भाविकांकडून होऊ लागली आहे.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेकडो भाविक दरवर्षी हज यात्रेला जातात. यात्रेला जाताना त्याची रक्कम पुर्वी अदा करावी लागते. यावर्षी हजला जाणार्या यात्रेकरूंनी आतापर्यंत दोन हप्ते कमिटीकडे जमा केले. तिसरा हप्ता देणे बाकी आहे. मात्र औरंगाबादहून जाणार्या भाविकांना व मुंबईहून जाणार्या भाविकांना वेगवेगळी रक्कम अदा करावी लागणार आहे. मुंबईहून जाणार्या भाविकाला 53 हजार 43 तर औरंगाबादहून जाणार्या भाविकाला 1 लाख 938 रुपये लागत आहेत. याबाबत बीडच्या भाविकांनी नाराजी व्यक्त करत हज कमिटीकडे जाब विचारणे सुरू केले आहे. राष्ट्रीय हज कमिटीने यावर वेळीच तोडगा काढावा आणि मराठवाड्यातील भाविकांना जी वाढीव रक्कम लावली आहे ती कमी करावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
दरम्यान वाढीव पैशाच्या संदर्भात अनुभवी असलेल्या अब्दुल करीम यांच्याकडे विचारना केली असता ते म्हणाले की, संभाजीनगर येथून प्लेन नागपूरला जाते. तेथून मुंबईला जाते, या प्रवासाचे वाढीव भाडे संबंधित हज यात्रेकरूंकडून घेतले जाते. हे वाढीव भाडे घेणे चुकीचे आहे. सदर प्रकरणात लोक प्रतिनिधींसह सामाजिक संस्थांनी आवाज उठवावा.
-मोमीन अब्दुल करीम