आ. संदीप क्षीरसागर न्याय देणारे नेतृत्व – कल्याण आखाडे
बीड ( रिपोर्टर ): – सामाजिक – राजकिय कार्यासाठी मला माळी समाजाची नेहमीच मोलाची साथ असल्याचे भावोद्गार आ. संदीप क्षीरसागर यांनी काढले. नुकत्याच झालेल्या बीड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये माळी समाजाला प्रतिनिधीत्व दिल्याबद्दल आ. संदीपभैय्या क्षीरसागर यांचा तसेच या निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्याबद्दल संचालक विश्वासराव आखाडे यांचा सावता परिषद व माळी समाज बांधवांच्या वतीने संयुक्त सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.बीड येथील शासकिय विश्रामगृहात संपन्न झालेल्या या सत्कार समारंभाप्रसंगी पुढे बोलताना आ.क्षीरसागर म्हणाले की, खा.शरदचंद्रजी पवार यांच्या शिकवणुकीनुसार समाजातील सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची माझी भूमिका आहे. माझ्या निवडणुकीत मोक्याच्यावेळी सावता परिषदेची मला मोलाची मदत झाली. पुढील काळात माळी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
आमदार संदिपभैय्या क्षीरसागर हे न्याय देणारे तरुण तडफदार व जिगरबाज नेतृत्व असून सावता परिषद त्यांच्या सोबत खंबीरपणे राहील असे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. बीडचे माजी आमदार सय्यद सलीम, डॉ. बाबू जोगदंड, सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, माजी नगरसेवक तथा सावता नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव दुधाळ, मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित संचालक विश्वास आखाडे यांची याप्रसंगी समयोचीत भाषणे झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, तालुकाध्यक्ष विनेश उबाळे, युवा नेते सचिन दुधाळ, विशाल घाडगे, विष्णूपंत खेत्रे, सुनील शिंदे, राजाभाऊ गवळी, सरपंच राधाकिसन मेहेत्रे, नारायण साळुंके, अनिल बनकर, मोहनराव गोरे, संतराम पानखडे, राजाभाऊ बनसोडे, अशोक कातखडे, अण्णासाहेब साळुंके, राहुल साळुंके, सुधीर चौधरे, सुरेश बनकर, बाबुराव राऊत, गोपीनाथ काळे, गणेश नांगरे, संभाजी राऊत, सावता मुळे, रामराजे राऊत, श्रीहरी राऊत, संदीप नवले, ज्ञानदेव डाके, गणेश ओव्हाळ, विष्णू यादव, दत्ता शिंदे, नारायण राऊत, सलीम शेख, आनंदराव काळे, ईश्वर राऊत, बळीराम आखाडे, दिनकर कोरडे, जालिंदर आखाडे, अशोक आखाडे, नितीन खांडे, वैभव आखाडे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.सावता परिषदेचे जिल्हा महासचिव प्रा. रणजीत आखाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.