अतिक्रमण काढा नसता आत्मदहन करू -दाम्पत्याचा इशारा
बीड (रिपोर्टर) सरपंच-उपसरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याची लेखी तक्रार करत आपल्या जागेवर केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे नसता 21 मे रोजी आपण आपण आत्मदहन करू, असा इशारा केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील वृद्ध दाम्पत्य विष्णू मोतीराव तपसे व सीताबाई विष्णूत तपसे यांनी दिला आहे. सदरचे निवेदन हे जिल्हाप रिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना सुपूर्द करण्यात आले आहे.
केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील वृद्ध दाम्पत्य विष्णू मोतीराम तपसे व सीताबाई विष्णू तपसे यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामपंचायतला त्यांनी अर्ज दिला मात्र त्यांच्या जागेत गेलेलं अतिक्रमण काढण्याऐवजी या लोकांनी तपसे कुटुंबियांच्या जागेचेच मोजमाप केले. त्या मोजमापामध्ये तपसे कुटुंबियाची जागता योग्य भरली. परंतु त्यांच्या जागेत पांचाळ यांनी केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत काढले नाही. याबाबत सातत्याने ग्रामपंचायतीसह पंचायत समिती अधिकारी अणि जिल्हा परिषद अधिकारी याचंयाकडे तक्रार देऊनही या दाम्पत्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे सदरचे अतिक्रमण काढर्यात आले नाही. तर 21 मे रोजी अपाण आत्मदहन करू, असा इशारा विष्णू मोतीराम तपसे या वृद्धाने दिला आहे.