माजलगाव बाजार समिती सभापती
जयदत्त नरवडे; उपसभापती श्रीहरी मोरे
माजलगाव (रिपोर्टर)- -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडीत सभापती म्हणून राष्ट्रवादीचे जयदत्त नरवडे तर उपसभापती म्हणून श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
-राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात मागील 20 वर्षांपासून बाजार समिती आहे, त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 18 पैकी 12 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. रविवारी बाजार समिती सभागृहात सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी सर्व सदस्यांची बैठक झाली त्यावेळी राष्ट्रवादीकडून जयदत्त नरवडे व श्रीहरी मोरे यांनी तर भाजपकडून नितीन नाईकनवरे व मनोज जगताप यांनी सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते.त्यातील नितीन नाईकनवरे व मनोज जगताप यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सभापती म्हणून जयदत्त नरवडे व उपसभापती म्हणून श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर आमदार प्रकाश सोळंके, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक आबा डक, माजी सभापती संभाजी शेजुळ, कल्याण आबुज, चंद्रकांत शेजुळ यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकार्यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापतींचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.
पाटोदा-शिरूर बाजार समितीच्या सभापतीपदी रुपाली शिंदे तर उपसभापतीपदी नागरगोजे
पाटोदा (रिपोर्टर) बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडी होत आहेत. आज पाटोदा, शिरूर बाजार समितीच्या पदाधिकार्यांची निवड घोषीत करण्यात आली. सर्वानुमते सभापतीपदी रुपाली किरण शिंदे तर उपसभापतीपदी पांडुरंग दादाराव नागरगोजे यांची निवड करण्यात आली. ही बाजार समिती आ. सुरेश धस यांच्या ताब्यात आली असून निवड होताच धस समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
पाटोदा, शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आ. सुरेश धस यांचे वर्चस्व राहिले. धस यांच्या गटाला 13 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला 5 जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुका झाल्यानंतर सभापती आणि उपसभापतीपदांच्या निवडीची (पान 7 वर)
प्रक्रिया आज पार पडली. सकाळी पाटोदा येथील बाजार समितीच्या सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये एकमताने सभापतीपदी रुपाली किरण शिंदे तर उपसभापतीपदी पांडुरंग दादाराव नागरगोजे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केदार सुरेश यांनी काम पाहिले. पदाधिकार्यांच्या निवडी होताच धस समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला..निवडीनंतर सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी मधुकर तात्या गर्जे,मा.जि.प.सभापती महेंद्र गर्जे,मा.सभापती तात्यासाहेब हुले, नगराध्यक्ष सय्यद अब्दुल्ला,भारतीय जनता पार्टीचे पाटोदा तालुका अध्यक्ष भागवत येवले,भारतीय जनता पार्टीचे शिरूर तालुका अध्यक्ष सुरेश उगलमुगले,संतोष राख,सोमीनाथ कोल्हे,संजय सानप,भाऊसाहेब भवर, नवनाथ ढाकणे,रामेश्वर गोरे,प्रकाश खेडकर,पद्माकर घुमरे,कल्याण भोसले,किरण शिंदे, बाळासाहेब चवरे,किरण चौरे,गणेश शेवाळे,गणेश शेवाळे,सोले पाटील सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.