तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी पथकासह केली कृषी सेवा केंद्रांची तपासणी
ई पॉस मशीन बंधनकारक
आष्टी (रिपोर्टर ):- खरीप हंगामामध्ये निकृष्ट दर्जाचे ज्यादा दराने खते बियांची विक्री करणार्या दुकानावर कृषी विभागाची आता करडी नजर राहणार असून खते व बियाण्यांच्या विक्रीसाठी कृषी दुकानदारांनी ई पॉस मशीन वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे यामुळे शेतकर्यांच्या फसवणुकीला चाप बसणार आहे यासाठी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह पथक अलर्ट झाले आहे.तालुक्यात खरीप हंगामात 97 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी करण्यात येत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे यात कापूस, मका,बाजरी, मुग,उडीद,तुर,भुईमूग सोयाबीन आदी पिकांचा समावेश असून पावसाळा जवळ आल्यानंतर बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू असते शेतकर्यांची मागणी लक्षात घेत दुकानदार निकृष्ट दर्जाची खते बियाणे शेतकर्यांच्या माध्यमातून शिवाय काळाबाजार करून जास्तीचे पैसे घेतले जातात तालुक्यात असे प्रकार अनेकदा घडले असून कृषी विभागाने कडक कारवाई केली आहे खरीप हंगामात असे प्रकार होऊ नयेत यासाठी आष्टी कृषी विभागाने कंबर कसली असून शुक्रवारी दिनांक 26 मे रोजी तालुक्यातील धानोरा कडा धामणगाव येथील कृषी सेवा केंद्रांची तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी तपासणी केली यावेळी कृषी केंद्र साठा रजिस्टर बाबींची पडताळणी करण्यात आली दुकानांमध्ये ई पॉस मशीन ठेवणे, भाव फलक लावणे, स्टॉक लिस्ट ठेवणे पक्की बिले देणे अशा विविध सूचना यावेळी दुकानदारांना देण्यात आल्या यावेळी मंडळ कृषी अधिकारी रविराज शिदोरे, प्रशांत पोळ ,आत्माचे रहीमतुल्ला बेग,कैलास जाधव, राजेंद्र धोंडे उपस्थित होते.
दोषी आढळल्यास कारवाई अटळ
भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्रावरती अंकुश ठेवला जाणार आहे यासाठी सातत्याने कृषी दुकानांची तपासणी केली जाणार आहे.दोषी असल्यास कारवाई केली जाईल शेतकर्यांनी बियाणे व खतांची खरेदी करताना दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे तसेच बियाण्याची पाकीट दुकानदारांकडून काळाबाजार होत असल्यास कृषी विभागाशी तात्काळ संपर्क करावा असे आवाहन कृषी विभाग आष्टी यांच्याकडून करण्यात आले आहे.