Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडपरळीउड्डाण पुलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या परळी शहरातील घटना

उड्डाण पुलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या परळी शहरातील घटना


परळी (रिपोर्टर) शहरातील उड्डाणपुलावरून उडी घेऊन एका 26 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सदरील महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.


रोहीणी रामहरी नागरगोजे (वय 26 वर्षे, रा. अरुणोदय कॉलनी, परळी शहर) या महिलेने आज सकाळी परळी शहरातील उड्डाण पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!